Sunday, April 5, 2026
Homeक्रीडाNashik Crime News: मद्यालयाबाहेर फुकट्यांचा उच्छाद; दगडफेक करुन चाळीस हजारांची खंडणी उकळली

Nashik Crime News: मद्यालयाबाहेर फुकट्यांचा उच्छाद; दगडफेक करुन चाळीस हजारांची खंडणी उकळली

नाशिक | प्रतिनिधी
गंगापूर रोडवरील जेहान सर्कलवरील एका वाईनशॉपमध्ये दोघा फुकट्यांनी उच्छाद मांडल्याची घटना (दि. ११) घडली. दरम्यान, या दोघांनी ‘फ्री’ मध्ये मद्याची मागणी करून नकार मिळताच शॉपवर दगडफेक केली. या घटनेने विद्युत डीपीतून शॉर्टसर्किट होऊन मद्यालयासह सोसायटीस आग लागून रहिवाश्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल, असे कृत्य केल्याने दोघांवर गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदवून गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे. शिवाजी उर्फ बाळा पोपट गांगुर्डे (वय २८, रा. सावरकरनगर, गंगापूर रोड, मुळ रा. रक्ळगाव ता. दिंडोरी जि. नाशिक) व राजू हनुमंता माळी (वय ३०, रा. चांदशी) अशी संशयितांची नावे आहेत.

नेलींकर चौकाजवळील ‘द मदिरा’ वाईन शॉपचे प्रणील ठाकरे (वय ३१, रा. मखमलाबाद नाका, पंचवटी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते बुधवारी (दि. ११) शॉपमध्ये असताना दोघे संशयित आले. त्यांनी मोफत मद्याची मागणी केली असता दुकानातील सेल्समनने नकार दिला. त्याचा राग आल्याने दोघांनी संगनमत करुन शॉपवर दगडफेक केली. यात दुकानाचे व मद्याचे साठ हजार रुपयांचे नुक्सान केले. घटनेची माहिती कळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जम्वेंद्रसिंग राजपूत व डीबी पथक दाखल झाले. या गंभीर प्रकाराची दखल घेऊन पोलिसांनी दोघांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेत दाखल गुन्ह्यात अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, एक संशयित ड्रायव्हर लाईनचे काम करतो तर दुसरा घरगुती साहित्य रिपेअरिंगचे काम करतो. केवळ फुकटात मद्य पाहिजे या उद्देशाने त्यांनी हा धुडगूस घातल्याचे तपासात निषन्न झाले आहे.

- Advertisement -

संशयितांनी शॉपवर व विद्युत डीपीवर केलेल्या दगडफेकीमुळे दुकानातील अल्कोहोल व स्पिरिट मिश्रित मद्य साठ्याला व संपूर्ण सोसायटीला आग लागण्याची दाट शक्यता होती. तसे झाले असते तर सोसायटीत राहणाऱ्या रहिवाश्यांच्या जिवितास धोका निर्माण होऊ शकतो याची जाणीव असताना तसे कृत्य केले. विशेष म्हणजे दोघांनी यापूर्वी देखील याच दुकानात जबरीने शिरुन ठाकरे व त्यांच्या स्टाफला जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती आणि खंडणी स्वरुपात चाळीस हजार रूपये उकळले आहेत, असे समोर आले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik News : विस्डम हाय इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

0
नाशिक | Nashik विस्डम हाय ग्रुप ऑफ स्कूल्सच्या (Wisdom High International School) विद्यार्थ्यांनी (Student) कुंभाथॉन द इन्क्युबेशन सेंटर आयोजित युरेका आयडिया बॉक्स या उपक्रमात उत्कृष्ट...