Sunday, May 10, 2026
HomeनाशिकNashik News : विस्डम हाय इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

Nashik News : विस्डम हाय इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

नाशिक | Nashik

विस्डम हाय ग्रुप ऑफ स्कूल्सच्या (Wisdom High International School) विद्यार्थ्यांनी (Student) कुंभाथॉन द इन्क्युबेशन सेंटर आयोजित युरेका आयडिया बॉक्स या उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, समस्या सोडवण्याची क्षमता आणि उद्योजकतेची विचारसरणी विकसित करणे हा होता.

- Advertisement -

या उपक्रमाची सुरुवात शाळेतील असेंब्ली मधून झाली, जिथे विद्यार्थ्यांना या संकल्पनेची ओळख करून देण्यात आली. त्यानंतर त्यांना एक ते दोन दिवसांचा वेळ देऊन त्यांच्या कल्पना लेखन व चित्रांच्या माध्यमातून मांडण्यासाठी वर्कशीट देण्यात आल्या. या सर्व कल्पनांची नंतर कुंभाथॉन टीमकडून छाननी करण्यात आली. ३५०० पेक्षा जास्त कल्पनांमधून फक्त १२० कल्पना निवडण्यात आल्या ज्यामुळे ही स्पर्धा अत्यंत कठीण ठरली.

दरम्यान, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एक दिवसाच्या बूट कॅम्पसाठी आमंत्रित करण्यात आले. यात विस्डम हाय ग्रुप ऑफ स्कूल्सच्या ८ विद्यार्थ्यांची निवड झाली असून, त्यांचा सत्कार कर्मवीर बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालय (Karmaveer Baburao Thackeray College of Engineering) येथे शनिवार (दि.०४) रोजी करण्यात आला.

निवड झालेले विद्यार्थी

GOC कॅम्पस विद्यार्थी

इला घावरे (१०वी कॅम्ब्रिज)
जसलीम कौर सैनी (६वी CBSE)

SMC कॅम्पस विद्यार्थी

आरव तांबट (इयत्ता ६वी)
स्वाधिती देओरे (इयत्ता ६वी)
मिहिकिया मुंद्रा (इयत्ता ५वी)
रिषाण नागोरे (इयत्ता ६वी)
आर्ध्या शिंदे (इयत्ता ६वी)
साची पाटील (इयत्ता ६वी)

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपुरात आणखी एक भोंदूबाबा गजाआड

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur तंत्र मंत्राच्या साह्याने उतारे काढून जडीबुटी खाण्यास देऊन सुमारे 15 ते 16 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिसांनी तालुक्यातील पूर्व भागातील...