नाशिक | प्रतिनिधी | Nashik
स्वतःच विणलेल्या जाळ्यात शिकारी कसा अडकतो याचा प्रत्यय नाशिकच्या (Nashik) सातपूर परिसरात (Satpur Area) आला. आपल्या कार्यालयातून टॅब चोरीला गेल्याची आणि खंडणी मागितली असल्याची जात तक्रार घेऊन पोलीसांकडे गेलेला पत्रकार संशयित रवींद्र गणपत एरंडे ( Ravindra Erande) हा स्वतःच एका भीषण न्यूड व्हिडिओ स्कँडलचा ‘मास्टर’ असल्याचे तपासात समोर आले आहे. या धक्कादायक खुलाशानंतर सातपूर पोलिसांनी एरंडेला अटक केली असून, न्यायालयाने त्याला ६ एप्रिलपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : खरातच्या घरात पोतेभर पैसा; मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमधून हवाला रॅकेट!
२ एप्रिल रोजी रवींद्र एरंडे (६३, रा. विद्या, नीलकंठेश्वरनगर, सातपूर) याने अशोकनगर येथील रामजी कॉम्प्लेक्समधील आपल्या कार्यालयातून टॅब चोरीला गेल्याची तक्रार दिली होती. चोरीच्या बदल्यात खंडणी मागितली जात असल्याचेही त्याने म्हटले होते. सातपूर पोलिसांनी (Satpur Police) तत्परतेने तपास करत त्याचा पूर्वाश्रमीचा ऑफिसबॉय बकरे आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले. मात्र, चोरी गेलेल्या साहित्याचा आणि जप्त केलेल्या हार्डडिस्कचा तपास करताना पोलिसांचे डोळेच पांढरे झाले.
हे देखील वाचा : Nashik Crime News : लोंढे पिता-पुत्रांना दणका; महासंचालक कार्यालयाकडून ‘मोक्का’ मंजूर, न्यायालयात दोषारोपपत्र दाखल
जप्त केलेल्या डिजिटल पुराव्यांची तपासणी केली असता, त्यात अनेक पीडित महिलांच्या नावांचे स्वतंत्र ‘फोल्डर्स’ आढळले. यामध्ये महिलांचे लैंगिक शोषण करतानाचे आणि चोरून चित्रित केलेले (कॅप्बर्ड) न्यूड व्हिडिओ साठवण्यात आले होते. हे अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने चालवले जात असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. एका तक्रारदाराचा मास्टरमाइंड म्हणून समोर आलेला चेहरा नाशिक जिल्ह्यात व विशेषत्वे सातपूरला चर्चेचा आणि संतापाचा विषय ठरला आहे. दरम्यान, एरंडे याचाही मोबाईल जाप्त करण्यात आला आहे.
हे देखील वाचा : Breaking News : दिंडोरीत विहिरीत कार कोसळून नऊ जणांचा मृत्यू; दरगोडे कुटुंबीयांवर काळाचा घाला
बलात्कार आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
बकरेसह अन्य संशयितांना खंडणीत अटक (Arrested) होताच, एका पीडित महिलेने धैर्याने पुढे येत तक्रार दाखल केली. या फिर्यादीवरून संशयित रविंद्र एरंडे याच्यावर बलात्कार आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी त्याला अटक केल्यानंतर शनिवारी (दि. ४) अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (विशेष न्यायालय तिसरे) श्रीमती आर. एम. पांढरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.
हे देखील वाचा : Nashik Crime News : सातपूरला ‘खरात फाईल्स’ची पुनरावृत्ती! लैंगिक शोषण प्रकरणी रवींद्र एरंडेला बेड्या
तपासाचे हे महत्त्वाचे पैलू
न्यायालयात अभियोग कक्षाच्या सहायक संचालक अॅड. किरण बेंडभर आणि तपासाधिकारी सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी व सहायक सरकारी अभियोक्ता विजय साळुंके यांनी संशयिताला सात दिवसांच्या कोठडीची (Custody) मागणी केली. मात्र, खंडणीच्या गुन्ह्याच्या तपासात एरंडेचा टॅब आधीच जप्त करण्यात आला असून न्यायालयाने दोन दिवसांचीच पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे दोन दिवसांत या गुन्ह्याची व्याप्ती किती खोलवर पसरली आहे आणि यात नाशिकमधील आणखी किती महिलांचे शोषण व फसवणूक झाली आहे, याची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा : Nashik Dindori Accident News : मंत्री महाजन, भुसे, झिरवाळ यांच्यासह खासदार भगरेंकडून घटनास्थळाची पाहणी





