सटाणा | प्रतिनिधी | Satana
मालेगाव तालुक्यातील (Malegaon Taluka) डोंगराळे येथील चिमुरडीवर एका २४ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच आता सटाणा तालुक्यातील (Satana Taluka) खमताणे येथेही एका लहान मुलीवर सत्तर वर्षाच्या नराधमाने अत्याचार (Rape) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नराधमावर पोक्सो व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, नऊ वर्षीय बालिकेला खमताणे परिसरातील (Khamtane Area) हनुमान मंदिरात संशयित आरोपी नामदेव हरी गुंजाळ याने गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने घेऊन जाऊन अत्याचार केला. तसेच याप्रकरणी कुणाला काहीही सांगितले तर जिवे मारण्याची धमकी देखील या नराधमाने नऊ वर्षीय बालिकेला दिली होती. यानंतर अखेर मुलीने कुटुंबियांना घडलेला प्रसंग सांगितल्यावर हे प्रकरण उघडकीस आले. या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, सदर बालिकेस मालेगाव येथे वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, मुलीच्या आईने (Girl Mother) दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा (Case) दाखल करून अटक (Arrested) करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत करीत आहेत.





