Monday, November 23, 2026
HomeनाशिकNashik Crime News : २८ हजारांहून अधिक उपद्रवी तरुण ताब्यात; नाशिक...

Nashik Crime News : २८ हजारांहून अधिक उपद्रवी तरुण ताब्यात; नाशिक पोलिसांची जीटीए मोहीम

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी (Nashik City Police) आता पारंपरिक आकडेवारीच्या पलीकडे जात ‘पॉप कल्चर’ आणि गेमिंग ट्रेंडचा अनोखा आधार घेतला आहे. लोकप्रिय व्हिडीओ गेम (Video Game) मालिका ‘ग्रँड थेफ्ट ऑटो’ जीटीएच्या धर्तीवर ‘जीटीए: टवाळखाेर एडिशन’ ही मोहीम राबवत पोलिसांनी १ जानेवारी ते २० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत तब्बल २८,७५३ टवाळखोरांवर कारवाई केल्याची माहिती जाहीर केली आहे.

- Advertisement -

या मोहिमेतून केवळ कारवाईचा आकडाच नव्हे, तर तरुणाईशी संवाद साधणारी पोलिसांची (Police) नवी डिजिटल रणनीती अधोरेखित झाली आहे. शहर पोलिसांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया पोस्टमध्ये कारवाईच्या आकड्याला थेट गेमिंगच्या भाषेत ‘यंदा आमचा स्कोअर २८,७५३ वर पोहोचला आहे’ असे संबोधत, ‘किप रिपाेर्टिंग द गेम इद ऑन या हॅशटॅगचा वापर केला आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे, एकमेकांवर फटाके उडवणे यांसारख्या उपद्रवी प्रकारांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी दिलेल्या माहितीचा आधार घेऊन या कारवाया करण्यात आल्या आहेत.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांच्या ९९२३३२३३११ या व्हॉट्सॲप क्रमांकावर तसेच सोशल मीडिया मेसेजद्वारे प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारे संवेदनशील ठिकाणे हेरून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमध्ये नाशिकरोड, चांदशी पूल, सातपूर यांसारख्या भागांतील रात्रीच्या गस्तीची दृश्ये, संशयितांची ताब्यात घेण्याची प्रक्रिया आणि पोलिस ठाण्यांतील कारवाईचे संकलन मांडण्यात आले आहे. शहरातील १४ पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात राबवण्यात आलेल्या मोहिमेत गंगापूर पोलीस ठाणे (Gangapur Police Station) आघाडीवर राहिले असून, त्यापाठोपाठ सातपूर आणि अंबड पोलीस ठाण्यांचा क्रमांक लागतो.  

पोलीस ठाणे : एकूण कारवाई

आडगाव: २,१७८
पंचवटी: २,७०५
म्हसरूळ: १,६९९
सरकारवाडा: १,२९२
भद्रकाली: २,१४८
मुंबईनाका: १,४२०
गंगापूर: ३,१५०
सातपूर: २,९९३
अंबड: २,९९३
इंदिरानगर: २,०२१
उपनगर: १,५०५
नाशिकरोड: १,८०२
देवळाली कॅम्प: १,२२९
१४ चुंचाळे: १,६१८

ताज्या बातम्या

Nashik News : संचालक मंडळाची संख्या घटविण्यासह वारसा सभासदत्वावर होणार निर्णय;...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik उत्तर महाराष्ट्रातील (Uttar Maharashtra) नामांकित क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या संचालक मंडळाची संख्या कमी करण्याचा प्रस्ताव आणि गेल्या...