Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमNashik Crime : पंचवटी गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीला अठरा दिवसांनंतर पोलिसांनी ठोकल्या...

Nashik Crime : पंचवटी गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीला अठरा दिवसांनंतर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पंचवटीतील (Panchvati) राहुलवाडीत सन २०१७ मध्ये घडलेल्या किरण निकम (Kiran Nikam) याच्या हत्येतून निर्दाेषमुक्त सुटलेल्या सागर जाधव या सराईताचा खून (Murder) करण्यासाठी पूर्वनियाेजित कट रचून त्याच्यावर गावठी कट्ट्यातून गाेळी झाडणाऱ्या विकी उत्तम वाघ (वय ३४, रा. मायकाे दवाखान्याजवळ, दिंडाेरी राेड) या सराईत चाेरट्यास अखेर अठरा दिवसांनंतर पकडण्यात गुंडाविराेधी पथकास यश आले आहे. विशेष म्हणजे ओळख लपविण्यासाठी त्याने लाँज किंवा धर्मशाळेत न राहता गेली अठरा दिवस पुणे, औरंगाबाद व शिर्डी भागातील पेट्राेल पंपावर झाेपून गुजराण केल्याचे समाेर आले आहे.

- Advertisement -

किरण निकमच्या हत्येत जन्मठेपेची शिक्षा भाेगणारे मुख्य आराेपी संताेष उघडे व गणेश उघडे यांचे दाजी बाळासाहेब वाघमारे यांचे १६ सप्टेंबर राेजी आकस्मिक निधन (Passed Away) झाल्याने उघडे बंधुंचा कट्टर समर्थक सराईत सागर जाधव यांच्यासह नातलगांनी वाघमारे यांच्यावर अंत्यसंस्कार करुन घर गाठले हाेते. जाधव हा मध्यरात्री एक वाजता वाघमारे यांच्या घराजवळील भवर यांच्या ओट्यालगतच्या दुकानाजवळ माेबाईलवर ‘सर्फिंग’ करत असताना संशयित विकी उत्तम वाघसह अन्य २० संशयितांनी पूर्वनियाेजित कटानुसार, त्याला गाठून गावठी कट्ट्यातून दाेन गाेळ्या झाडून जीवघेणा हल्ला चढविला व पळ काढला हाेता.

YouTube video player

दरम्यान, यात एक गाेळी सागरच्या गालातून खाली येत मानेत अडकल्याने त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. क्लिष्ट शस्त्रक्रिया करुन अखेर ही गाेळी काढण्यात डाॅक्टरांना यश आले हाेते. त्याचवेळी फिर्याद दाखल झाल्यावर पंचवटी पाेलिसांनी सखाेल तपासास सुरुवात करुन प्रारंभी अकरा संशयितांना अटक (Suspected Arrested) केली. त्यांच्या चाैकशीनंतर भाजपाचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना अटक केली हाेती

ताज्या बातम्या

Nashik Accident News : चाचडगाव टोलनाक्याजवळ ईरटीका-स्कॉर्पिओचा भीषण अपघात; चौघे जागीच...

0
दिंडोरी | Dindori तालुक्यातील नाशिक-पेठ रस्त्यावरील (Nashik-Peth Road) चाचडगाव टोलनाक्याजवळ (Chachadgaon Toll Plaza) ईरटीका आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात (Ertika-Scorpio Accident) झाल्याची घटना घडली आहे. या...