Saturday, October 3, 2026
Homeक्राईमNashik Crime News : फुलेनगरात कोयता, बिअरच्या बाटल्यांनी धुमाकूळ; सुमित महालेसह सहा...

Nashik Crime News : फुलेनगरात कोयता, बिअरच्या बाटल्यांनी धुमाकूळ; सुमित महालेसह सहा जणांची पोलिसांकडून धिंड

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

पंचवटीतील फुलेनगर परिसरात (Phulenagar Area) जुन्या वादातून कुख्यात गुंड सुमित महाले आणि त्याच्या साथीदारांनी कोयता व बिअरच्या बाटल्यांच्या साहाय्याने धुमाकूळ घालत परिसरात दहशत निर्माण केली. एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड आणि नागरिकांना धमकावल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी (Panchvati Police) सुमित महालेसह सहा जणांविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयितांची धिंड काढून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वनिता संतोष खरात (वय ४०, रा. फुलेनगर, पंचवटी) या शनिवारी (दि. ११) रात्री साडेनऊच्या सुमारास घराबाहेर स्वयंपाक करत असताना जुन्या भांडणाचा राग मनात धरून संशयित सुमित दयानंद महाले (वय २३), मोन्या मोरे, काळ्या, सच्या भुताळ्या, उषा महाले, ललिता गांगुर्डे व त्यांच्या इतर साथीदारांनी तेथे येत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढताच सुमित महाले याने हातातील धारदार कोयता (Koyata) थेट वनिता खरात यांच्या दिशेने फेकला. मात्र त्यांनी प्रसंगावधान राखत बाजूला झाल्याने मोठी दुर्घटना टळली.

त्यानंतर आरोपींनी घरावर बिअरच्या रिकाम्या बाटल्या फेकल्या, तर महिला आरोपींनी दगड व विटांचे तुकडे भिरकावत दहशत निर्माण केली. यावरही न थांबता सुमित महाले याने हातातील कोयता हवेत फिरवत, “मी या परिसराचा भाई आहे, माझ्या नादी लागाल तर एका-एकाचा मुडदा पाडीन,” अशी धमकी देत परिसरात उघडपणे दहशत माजवली. त्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर कोयत्याने वार करून काचा फोडल्या. हातात उघडा कोयता घेऊन टोळके गल्लीत फिरत असल्याने नागरिकांची एकच पळापळ उडाली आणि काही काळ संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

मुख्य संशयित सुमित महाले याच्यावर यापूर्वीही पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchvati Police Station) दंगल, मारामारी, घातक शस्त्र बाळगणे आणि बेकायदेशीर जमाव जमवणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक पावशे करीत आहेत. तसेच परिसरात निर्माण झालेली दहशत लक्षात घेऊन पोलिसांनी संशयितांची धिंड काढत कायद्याचा धाक निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

ताज्या बातम्या

कुमकुम

अमरावतीच्या कुमकुम मोहोदचा ‘गोल्डन ॲरो’! वैयक्तिक रिकर्व्हमध्ये भारताला पहिले सुवर्ण

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiमहाराष्ट्राच्या अमरावतीची अवघी १७ वर्षांची कुमकुम मोहोड हिने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये तिरंदाजीच्या महिला वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात ऐतिहासिक...