Saturday, July 25, 2026
Homeक्राईमTrimbakeshwar Darshan Scam : डिजिटल पुराव्यांचा चक्रव्यूह; ३०० पानांच्या दोषारोपपत्रातून गैरव्यवहाराचे...

Trimbakeshwar Darshan Scam : डिजिटल पुराव्यांचा चक्रव्यूह; ३०० पानांच्या दोषारोपपत्रातून गैरव्यवहाराचे धागेदोरे समाेर

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली भाविकांची आर्थिक लूट करणाऱ्या रॅकेटप्रकरणी पोलिसांनी (Police) न्यायालयात (Court) तब्बल ३०० पानांचे दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले आहे. या दोषारोपपत्रामुळे देवस्थानचे विश्वस्त आणि या रॅकेटचे मुख्य सूत्रधार पुरुषोत्तम कडलग यांच्यासह अन्य संशयितांभोवती तांत्रिक व डिजिटल पुराव्यांचा कायदेशीर फास आवळला गेल्याचे नवीन विश्लेषणातून समोर येत आहे. पुराव्यांचा हा चक्रव्यूह संशयितांना अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात (Trimbakeshwar Temple Area) सुरक्षेसाठी तैनात असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या (एमएसएफ) सुरक्षा रक्षकांनी पोलिसांना दिलेले जबाबही गंभीर स्वरुपाचे असल्याचे समाेर आले आहे. मुख्य सूत्रधार पुरुषोत्तम कडलग (Purushottam Kadlag) यांनी पदाचा थेट गैरवापर केल्याचे यातून समोर आले आहे. कडलग यांनी सुरक्षारक्षकांवर कशा प्रकारे दबाव आणला आणि व्हीआयपी दर्शनासाठी अंतर्गत हालचाली कशा वळवल्या, याचा थेट डोळ्यांदेखतचा वृत्तांत या जबाबांमध्ये नोंदवण्यात आला आहे. 

दरम्यान, तोंडी जबाबांवर अवलंबून न राहता पोलिसांनी या गुन्ह्यात (Case) इलेक्ट्रॉनिक पुरावे गोळा केले आहेत. भाविकांकडून बेकायदेशीरपणे उकळलेली लाखो रुपयांची रक्कम संशयितांच्या बँक खात्यात कशी वळवली गेली, याचा संपूर्ण ‘मनी ट्रेल’ बँक स्टेटमेंट्सद्वारे न्यायालयासमोर आणला गेला आहे. या आर्थिक व्यवहारांसोबतच, भाविकांना अनधिकृत मार्गाने थेट मंदिरात प्रवेश मिळवून देतानाचे ‘सीसीटीव्ही फूटेज’ पोलिसांनी हस्तगत केले आहे. हा डिजिटल पुरावा या खटल्यातील सर्वात मोठा पुरावा मानला जात आहे.

​स्टिंग ऑपरेशन आणि २० साक्षीदार

​एका जागरूक भाविकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मंदिर परिसरात गाेपनीय ‘स्टिंग ऑपरेशन’ रचून या ‘पेड दर्शन’ रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या कारवाईत विश्वस्त पुरुषोत्तम कडलग, त्यांचे दोन पुतणे ओम आणि अभिषेक आणि काही स्थानिक एजंट्सना अटक करण्यात आली होती. आता या संशयितांना कडक शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलिसांनी २० महत्त्वपूर्ण साक्षीदारांची फळी न्यायालयात उभी केली आहे. यामध्ये फसवणूक झालेले भाविक, स्टिंग ऑपरेशनमधील प्रत्यक्षदर्शी आणि मंदिर प्रशासनातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : २५ जुलै २०२६ – राष्ट्रकुलची परीक्षा; उंच भरारीची आशा

0
ग्लास्गो येथे सुरू झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत यजमान स्कॉटलंडने काही महत्त्वाचे आणि लोकप्रिय खेळ वगळण्याचा एकतर्फी निर्णय घेतल्याचा फटका सर्वच सहभागी देशांना बसणार असला,...