Monday, November 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजWeather Update : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना पावसाचा इशारा; अर्णबनंतर 'मुरासु' चक्रीवादळाचा धोका

Weather Update : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; अर्णबनंतर ‘मुरासु’ चक्रीवादळाचा धोका

मुंबई | Mumbai

ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील (Maharashtra) हवामानात मोठा बदल पाहायला मिळाला आहे. पुणे, अहिल्यानगर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला, तरी अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते जलमय होऊन वाहतूक विस्कळीत झाली.

- Advertisement -

दरम्यान, पश्चिम बंगालच्या (West Bengal) उपसागरात ‘अर्णब’नंतर आता ‘मुरासु’ नावाचे नवे चक्रीवादळ तयार झाले असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट (Rain Alert) जारी करण्यात आला आहे.

ऑक्टोबर महिन्यात तब्बल ९५ टक्के पावसाची तूट

अचानक झालेल्या या पावसानंतरही राज्यात पाण्याच्या कमतरतेची चिंता कायम आहे, कारण संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात सरासरीच्या तुलनेत तब्बल ९५ टक्के कमी पाऊस नोंदवला गेला.मुंबई शहर, धुळे, जळगाव, नंदुरबार, सोलापूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, जालना, लातूर आणि परभणी या १२ जिल्ह्यांमध्ये ऑक्टोबरमध्ये पावसाचा एकही थेंब पडला नाही.

‘मुरासु’ चक्रीवादळ आणि हवामानातील बदल

छत्तीसगडजवळ निर्माण झालेले ‘डीप डिप्रेशन’ आणि चेन्नईजवळ आकारास येत असलेल्या ‘मुरासु’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील वातावरणात मोठे फेरबदल होत आहेत. या चक्रीवादळाचा थेट फटका राज्याला बसणार नसला तरी त्याचा प्रभाव जाणवणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ताशी ४० ते ५० किमी वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज ‘स्कायमेट’ने वर्तवला आहे. नवी मुंबई व रायगडमध्ये हलक्या सरींना सुरुवात झाली असून मुंबई व उपनगरांत सकाळी व रात्री दिलासादायक, तर दुपारी उष्ण वातावरण राहील.

कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा?

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गुलाबी थंडीचे आगमन होण्याऐवजी नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच छत्र्या बाहेर काढण्याची वेळ आल्याचे चित्र सध्या राज्यात दिसत आहे.

ताज्या बातम्या

राष्ट्रवादी

दिल्लीत मोठ्या घडामोडी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली अमित शाहांची भेट? कारण...

0
नवी दिल्ली | New Delhiविधान परिषद निवडणुकीतील पराभव आणि पक्षांतर्गत नाराजीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. पक्षाच्या नेतृत्वाबाबत, मंत्रिमंडळातील खातेवाटपाबाबत आणि...