Saturday, October 17, 2026
Homeक्राईमNashik Crime News : मला अटक केली तर जीव देईन! गॅलरीतून उडी...

Nashik Crime News : मला अटक केली तर जीव देईन! गॅलरीतून उडी मारण्याची धमकी देणारा एमपीआयडी गुन्ह्यातील संशयित गजाआड

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी पोलीस ठाण्यात (Pathardi Police Station) दाखल असलेल्या आर्थिक फसवणुकीच्या (एमपीआयडी) गुन्ह्यात मागील दीड महिन्यापासून पसार असलेला मुख्य संशयित सुनील बाबासाहेब शिरसाठ (वय २६, रा. मोहज बुद्रक, ता. पाथर्डी) यास नाशिकरोड गुन्हे शाखेच्या पथकाने नाट्यमय घडामोडीत कारवाई करत बेड्या ठोकल्या आहेत.

- Advertisement -

अटक टाळण्यासाठी शिरसाठने नाशिकरोडमधील (Nashik Road) रुद्र हाईट्स इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील फ्लॅटच्या गॅलरीतून खाली उडी मारून आत्महत्या करण्याची धमकी दिली होती; मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखत सतर्कता दाखवत त्याला शिताफीने ताब्यात घेतले. ​आहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६(५), ३१८(४), ३(५) तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबद्धांचे संरक्षण (एमपीआयडी) कायदा कलम ३ व ४ अन्वये ०९ सप्टेंबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यात (Case) सुनील शिरसाठ हा सलग दीड महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देऊन फरार होता. सुनील शिरसाठ हा नाशिकरोड परिसरात लपून बसल्याची खात्रीशीर माहिती नाशिक शहर गुन्हेशाखेचे सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांना मिळाली. त्यांनी तत्काळ नाशिकरोड गुन्हे शाखेचे प्रभारी संदीप पवार यांना कळवून कारवाईचे (Action) आदेश दिले.

उडी मारण्याचा रचला थरार

​पोलीस पथक रुद्र हाईट्स इमारतीत पोहोचले असता, सुनील शिरसाठ याने फ्लॅट क्रमांक पाचच्या गॅलरीत जाऊन, पोलिसांनी जवळ येण्याचा प्रयत्न केला, तर गॅलरीतून खाली उडी मारून जीवन संपवीन, अशी धमकी देण्यास सुरुवात केली. तो मानसिकदृष्ट्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी तातडीने नाशिकरोड अग्निशमन दलासही पाचारण केले. ​दरम्यान, पोलिस पथकाने संयम आणि धाडसाचे प्रदर्शन करत शिडीच्या मदतीने व कौशल्याने गॅलरीत प्रवेश केला आणि अनर्थ होण्यापूर्वीच त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याला आहिल्यानगर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे ताब्यात देण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातील लोहगड हत्याप्रकरणात मोठी घडामोड; उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील, 5,053...

0
पुणे । Pune सुरुवातीला अपघाताचा आभास निर्माण करून अत्यंत कटकारस्थान रचून घडवून आणलेल्या पुण्यातील लोहगड येथील केतन अग्रवाल हत्याप्रकरणात आता एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी...