Saturday, June 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Crime News : नाशिकमध्ये एमडी ड्रग्जचा भाव दुप्पट

Nashik Crime News : नाशिकमध्ये एमडी ड्रग्जचा भाव दुप्पट

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मागील दोन ते तीन वर्षांत नाशिक पोलिसांनी (Nashik Police) अमली पदार्थ तस्करांविरुद्ध जोरदार मोहीम उघडली असली, तरी शहरात ड्रग्जची पाळेमुळे रुजली आहेत, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. अवध्या तीन वर्षात नाशिकमध्ये मॅफेड्रॉन (MD Drugs) या जीवघेण्या ड्रग्जच्या किमती दुप्पट झाल्या आहेत, तरीही शहरातील तरुणाईला विळखा घालणारा हा काळाबाजार थांबलेला नाही. नुकतेब नाशिक शहर अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनजीपीए) मुंबईनाका परिसरात एका मोठ्या कारवाईत तिघा तस्करांना बेड्या ठोकल्या असून, या तपालातून आता ड्रग्जचे थेट मालेगाव कनेक्शन उघडकीस आले आहे.

- Advertisement -

सन २०२३ मध्ये जेव्हा ड्रग्ज माफिया ललित पानपाटील, सनी पगारे आणि नसरीन शेख उर्फ छोटी भाभी या टोळ्यांचा (Gang) पर्दाफाश झाला, तेव्हा नाशिकमध्ये एमडीचा दर प्रति ग्रॅम दोन ते अडीच हजार रुपये होता. पोलिसांच्या कडक कारवाईमुळे नाशिकमधील स्थानिक नेटवर्क विस्कळीत झाले आणि माल मिळणे कठीण झाले होते. मात्र. तस्करांनी या टंचाईचा फायदा घेत किमती थेट साडेबार ते पाच हजार रुपये प्रति ग्रॅमवर पोहोचवल्या आहेत, हे वास्तव कालच्या कारवाईतून समोर आले आहे. नुकत्याच पकडल्या गेलेल्या संशयितांनी हे ड्रग्ज थेट मालेगावातून आणल्याची कबुली दिल्याने, नाशिकमधील ड्रान पुखठगचा नवा मार्ग पोलिसांच्या रडारवर आला आहे.

एनडीपीएस पथकाचे (NDPS Squad) अंमलदार चंद्रकांत बागडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे,वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशीला कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील, सचिन चौधरी, श्रेणी पोलिस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, सहायक उपनिरीक्षक संजय ताजणे, देवकिसन गायकर, अमलदार बाळासाहेब नाहे, भारत डेबाळे, अर्चना भड आदींचे पथक रवाना केले. पथकाने मुंबईनाका परिसरात सापळा रचला. संशयित जाकीर रफीक शेख (३५, रा. भद्रकाली) हा त्याच्या साथीदारांसह एका कारमधून तेथे पोहोचताच पोलिसांनी त्यांना वेढा घालून ताब्यात घेतले.

दरम्यान, या कारवाईत पोलिसांनी (Police) एकूण सात लाख ३६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला अटक करण्यात आलेल्यांमध्ये शाहरूख युसूफ शेख (३०, रा. पंचशीलनगर) आणि सिराज सोहराब शेख (३९, रा. शरणपूररोड) यांचा समावेश आहे, किमती वाढूनही नाशिकमध्ये ड्रग्जची खरेदी करणारे हे ग्राहक कोण? आणि मालेगावातील मुख्य सूत्रधार कोण आहे? याचा तपास मुंबईनाका पोलिस करत आहेत.

गुन्हेगारीतही नातेसंबंध!

या तपासातील धक्कादायक बाब म्हणजे अटक केलेले तिघेही संशयित एकमेकांचे नातलग अहेत, पैशांच्या हव्यासापोटी या नातेवाइकांनी एकत्र येत हे ड्रग्ज नेट्वर्क तयार वेले होते. गुपचूर व्यवहार करणे आणि पोलिसांची नजर चुकवणे सोपे जावे, म्हणूनच या फॅमिली सिंडिक्टचा वापर केला जात हेता. मात्र, खार्कच्या कडक नजसे या नात्यांमागील काळ चेहर उघड केला आहे.

तस्करांकडून काय जप्त केले?

  • जाकीर शेख याच्या खिशातून ४० हजार रुपये किमतीचे ८५ ग्रॅम एमडी आणि मोबाईल जात
  • शाहरूख शेख वाध्यायखून ८,७०० रुपयांची रोकड आणि दोन महगडे मोबाईल जप्त.
  • सिराज शेख याच्याकडून १२,९०० रुपयांची रोकड, १ लाखाचा मोबाइल आणि तस्वीसाठी वापरलेली ५. लाखांची कार जात.

ताज्या बातम्या

Pawanraje Nimbalkar Case : मोठी बातमी! पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणातील सर्व आरोपींची...

0
मुंबई | Mumbai राज्यातील राजकीय वर्तुळाला हादरवून सोडणाऱ्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड (Pawanraje Nimbalkar Case) प्रकरणाचा निकाल आज (शनिवारी) तब्बल २० वर्षांनी देण्यात आला....