Thursday, October 1, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSimhastha Kumbhmela 2027 - रस्ते विकासकामांना वेग; रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता नियंत्रण पथकाकडून...

Simhastha Kumbhmela 2027 – रस्ते विकासकामांना वेग; रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता नियंत्रण पथकाकडून पाहणी

नाशिक : प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या रस्ते विकासकामांना वेग आला असून, कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या (NTKMA) गुणवत्ता नियंत्रण पथकाने तीन महत्त्वाच्या रस्त्यांची पाहणी केली. अंबड-सातपूर लिंक रोड, एक्सएलओ पॉइंट ते गरवारे रस्ता आणि शरणपूर पोलिस चौकी ते केटीएचएम कॉर्नर या रस्त्यांच्या कामांचा यावेळी आढावा घेण्यात आला.

पाहणीदरम्यान महापालिकेकडून सुरू असलेल्या रस्ते कामांची गुणवत्ता चांगली असल्याचे समाधान पथकाने व्यक्त केले. तसेच गेल्या काही महिन्यांत रस्त्यांच्या कामाचा वेग वाढल्याचेही निदर्शनास आले. कामांची गुणवत्ता कायम राखत उर्वरित कामे लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणेला प्रोत्साहन देण्यात आले.

सिंहस्थाच्या दृष्टीने शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे कामाचा वेग कायम ठेवण्याबरोबरच दर्जाबाबत काटेकोरपणे लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

या पाहणीवेळी सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह प्राधिकरण व महापालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Kopargaon : महागाई, मतदार याद्यांतील घोळ आणि दुष्काळावरून रोहित पवारांचा सरकारवर...

0
कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargaon वाढती महागाई, मतदार याद्यांतील कथित घोळ, राज्यातील दुष्काळी परिस्थिती तसेच जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील घडामोडींवरून आ. रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली....