Tuesday, November 24, 2026
Homeक्राईमNashik News : बँक अपहार अन् कोट्यवधींच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; संशयित...

Nashik News : बँक अपहार अन् कोट्यवधींच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; संशयित थोरातचा उपचारादरम्यान मृत्यू

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

अहिल्यानगर जिल्ह्यातील (Ahilyanagar District) सह्याद्री मल्टिस्टेट (मल्टिसिटी) निधी कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष संदीप सुधाकर थोरात (वय ३८, रा. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह) (Nashik Road Jail) यांचा नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील बँक अपहार आणि कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात ते न्यायालयीन कोठडीत होते आणि मागील चार महिन्यांपासून नाशिक मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त होते.

- Advertisement -

​पाेलिसांच्या माहितीनुसार, कारागृहात असताना संशयित संदीप थोरात यांना दम्याचा आणि श्वास घेण्याचा तीव्र त्रास होत होता. प्रकृती बिघडल्याने त्यांना ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी कारागृहातून पुढील औषधोपचारासाठी दुपारी दाेन वाजता नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात (Nashik Civil Hospital) दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना (दि. ९) २०२६ रोजी त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि डॉक्टर गिरीश बोरकर यांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ​मृतदेह पुढील तपासणी व प्रक्रियेसाठी धुळ्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला असून, तेथून व्हिसेरा नमुना छ. संभाजीनगर येथे पाठविण्यात येणार आहेत.

आर्थिक फसवणुकीचे आरोप

​संदीप थोरात यांनी ‘क्लासिक ब्रिज मनी सोल्युशन’ आणि सह्याद्री कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप आहे. याप्रकरणी अहिल्यानगर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सखोल चौकशी सुरू होती. बँक अपहार प्रकरणात कारवाई झाल्यानंतर त्यांना नाशिक कारागृहात ठेवण्यात आले होते, जिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ऊसदरावर निर्णय न झाल्यास शनिवारी रेलरोको-रास्तारोको

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या ऊसाला राज्यातील अन्य जिल्ह्याप्रमाणे भाव मिळावा, या मागणीसाठी 26 तारखेला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत...