Monday, September 7, 2026
Homeक्राईमNashik TCS Case : 'हानिया' नावाचा इंटरनेटवर शोध; एसआयटीचे न्यायालयात गंभीर पुरावे,...

Nashik TCS Case : ‘हानिया’ नावाचा इंटरनेटवर शोध; एसआयटीचे न्यायालयात गंभीर पुरावे, संशयितांच्या जामिनावर उद्या सुनावणी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

टीसीएस कंपनीत (TCS Company) कार्यरत एका अविवाहित तरुणीवरील बलात्कार आणि बळजबरीने धर्मांतर प्रकरणात संशयितांनी (Suspected) पीडितेचे धर्मांतर करून तिचे नाव ‘हानिया’ ठेवण्यासाठी तब्बल एक वर्षापूर्वी, म्हणजेच ५ एप्रिल २०२५ रोजी इंटरनेटवर सर्च केल्याचे विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) तपासात समोर आले आहे. या डिजिटल पुराव्यामुळे संशयितांचा पूर्वनियोजित कट उघडकीस आला असून, या प्रकरणात संशयितांच्या जामिनावर उद्या, मंगळवारी (दि. ३०) नाशिकरोड न्यायालय (Nashik Road Court) अंतिम निर्णय देण्याची शक्यता आहे.

एसआयटीने न्यायालयात (SIT Court) सादर केलेल्या पुराव्यानुसार, संशयितांनी पीडितेची सर्व सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रे स्वतःच्या ताब्यात घेतली होती. त्यानंतर तिचे बेकायदेशीरपणे नामांतर करून, तिच्या बदललेल्या ‘हानिया’ या नावाने नऊ हजार रुपयांची ‘जकात’ देखील भरली होती. या सर्व तांत्रिक आणि आर्थिक बाबींचे पुरावे न्यायालयासमोर ठेवल्याने संशयितांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या संवेदनशील प्रकरणात पोलिसांनी तब्बल १५०० पानांचे दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले आहे.

देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात (Deolali Camp Police Station) पीडितेच्या तक्रारीवरून मुख्य संशयित दानिश शेख, तौसिफ अत्तार आणि निदा खान यांच्यावर गुन्हा दाखल असून ते सध्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आहेत. तर, छत्रपती संभाजीनगरमधील ‘एमआयएम’चा नगरसेवक मतीन पटेल आणि घरमालक हनिफ शेख यांन एसआयटीने सहसंशयित केले आहे. संशयित निदा खान (Nida Khan) हिला मतीन पटेलनेच हनिफचे घर भाड्याने मिळवून देऊन आश्रय दिला होता. तर मालेगावच्य ‘इस्लाम पार्टी’चे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार आसिफ शेख यांनी मुख्य संशयित दानिश शेख याला कायदेशीर वकिलांची मदत पुरवली आहे.

वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे आदेश

नाशिकरोड न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान संशयित निदा खान हिच्या वतीने वकील प्रतीक ताजनपुरे यांनी वकिलीपत्र सादर केले. निदा खान सध्या गर्भवती असून कारागृहातील जड कामांमुळे व शरीरातील लोहाच्या कमतरतेमुळे तिची प्रकृती चिंताजनक असल्याचा दावा वकिलांनी केला. यापूर्वी तिचा एकदा गर्भपात झाला असल्याने तिला तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. न्यायालयाने हा अर्ज मंजूर करत मध्यवर्ती कारागृह प्रशासन आणि पोलिसांना निदाच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश दिले आहेत.

उद्या जामिनावर अंतिम फैसला

या प्रकरणातील संशयितांच्या जामिनावर गेल्या १९ जून रोजी सरकारी वकील आणि बचाव पक्षातर्फे तब्बल तीन तास जोरदार युक्तिवाद झाला होता. त्यानंतर न्यायालयाने २५ जून ही तारीख अंतिम आदेशासाठी निश्चित केली होती, परंतु न्यायालयीन व्यस्ततेमुळे हा निर्णय होऊ शकला नाही. आता मंगळवारी (दि. ३०) न्यायालय संशयितांना जामीन मंजूर करणार की त्यांचा मुक्काम जेलमध्येच राहणार, यावर अंतिम आदेश देणार आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ‘बॉस’ने सांगितलं म्हणजे विषय संपला

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील नेत्यामध्ये माझ्या नावावर सहमती होत नसेल आणि वाद होत असतील, तर मला जिल्हा बँकेच्या पदावर बसण्याची कोणतीही इच्छा नाही, असे स्पष्ट...