Monday, October 12, 2026
HomeनाशिकShalarth ID Scam : संस्थाचालकांकडे SIT चा मोर्चा! मुख्याध्यापकांच्या पळवाट दाव्यांनंतर पोलिसांकडून...

Shalarth ID Scam : संस्थाचालकांकडे SIT चा मोर्चा! मुख्याध्यापकांच्या पळवाट दाव्यांनंतर पोलिसांकडून कागदोपत्री पुराव्यांच्या संकलनावर भर

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

कोट्यवधी रुपयांच्या बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्यात (Shalarth ID Scam) विशेष तपास पथकाने (एसआयटी) तपासाचा फास आवळला आहे. चौकशीदरम्यान अनेक मुख्याध्यापकांनी सर्व कागदपत्रे आणि सूत्रे संस्थाचालकांच्याच ताब्यात आहेत, अशी ढाल पुढे केल्याने, आता एसआयटीचा मोर्चा या घोटाळ्याच्या पडद्यामागच्या मुख्य सूत्रधारांकडे (संस्थाचालकांकडे) वळण्याची चिन्हे आहेत.

- Advertisement -

दरम्यान, अटकेची (Arrested) भीती आणि चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी अनेक मुख्याध्यापकांनी मोबाईल बंद ठेवून पळवाट शोधण्याचा प्रयत्न सुरू केल्याने तपासी यंत्रणांनी डिजिटल व कागदोपत्री पुराव्यांची नाकेबंदी करण्यास सुरुवात केली आहे. ​बनावट दस्तऐवज आणि शालार्थ प्रणालीतील त्रुटींचा गैरवापर करून तब्बल ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बनावट आयडी तयार करण्यात आले होते.

या माध्यमातून सुमारे १६० ते १७० कोटी रुपयांपेक्षा अधिक शासकीय निधीची लूट झाल्याचा प्राथमिक संशय आहे. शालार्थ प्रणालीमध्ये कोणत्याही कर्मचाऱ्याची माहिती अथवा मान्यता अपडेट करण्याची प्राथमिक प्रक्रिया मुख्याध्यापकांच्या अधिकृत लॉगिन आयडीवरूनच होते. याच तांत्रिक कारणास्तव एसआयटीने (SIT) सुरुवातीला शाळांच्या मुख्याध्यापकांना चौकशीच्या फेऱ्यात घेतले.

नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या चारही जिल्ह्यांतील संशयित शाळांमध्ये २ मुख्य आणि १० सह तपास पथकांनी अचानक भेटी देऊन झाडाझडती सुरू केली आहे. मात्र, तपासादरम्यान काही मुख्याध्यापकांनी सहकार्य केले असले, तरी बहुतांश जणांनी उत्तर देणे टाळले आहे. काहींनी फोन स्विच ऑफ केले आहेत, तर काहींनी आम्हाला यातील काहीही माहिती नाही, सर्व कागदपत्रे व निर्णय संस्थाचालकांचेच असतात, असा पवित्रा घेत स्वतःला निर्दोष दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

व्यक्तिंऐवजी पुराव्यांवर भर

​मुख्य संशयित आधीच गजाआड असून न्यायालयाने त्यांचे जामीन अर्ज फेटाळले आहेत. त्यामुळे न्यायालयासमोर भक्कम पुरावे ठेवण्यासाठी एसआयटीने आता व्यक्तींऐवजी कागदोपत्री व ऑनलाईन व्यवहारांवर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे.मुख्याध्यापक आणि संस्थाचालक यांच्यातील संशयास्पद व्यवहार, कागदपत्रांतील फेरफार आणि डिजिटल ठसे हा डेटा संकलित केला जात आहे. हे सर्व डिजिटल पुरावे येत्या काही दिवसांत न्यायालयात सादर होणाऱ्या पूरक दोषारोपपत्रात जोडले जाणार आहेत.

असा आहे तपासाचा आवाका

-​एकूण बनावट आयडी: ८४१ (शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी)
-​अंदाजे घोटाळा: १६० कोटी ते १७० कोटींहून अधिक
-​तपास यंत्रणा: २ मुख्य पथके व १० उप-तपास पथके (नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल)
​-व्याप्ती: नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्हा.
-संशयित १२०० हून अधिक

ताज्या बातम्या

Nashik Crime News : सी फाॅर्मची माहिती लपविणे अंगलट; पाच नामांकित हॉटेल्सवर...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik शहरात हॉटेल व लॉजिंगमध्ये वास्तव्यास येणाऱ्या परदेशी नागरिकांसह (Citizen) बाहेरील संशयित व्यक्तींची माहिती, पासपोर्ट, व्हिसा आणि अधिकृत सी-फॉर्मची माहिती पोलीस...