Thursday, June 11, 2026
HomeनाशिकNashik Crime News : ऑनलाईन जुगाराने घेतला बळी; सोळा वर्षीय मुलाची आत्महत्या

Nashik Crime News : ऑनलाईन जुगाराने घेतला बळी; सोळा वर्षीय मुलाची आत्महत्या

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

मोबाईल ॲपवर (Mobile App) जुगार खेळताना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्यामुळे येथील जयभवानी रोडवर (Jaybhavani Road)असलेल्या डायमंडनगरमधील एका सोळा वर्षाच्या मुलाने आत्महत्या (Suicide) केल्याचा खळबळजनक प्रकार घडला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

येथील जयभवानी रोड परिसरात राहणारा सम्राट भालेराव हा मोबाईलमधील ऑनलाईन ॲपवर जुगार (Gambling) खेळत होता. जुगारात त्याला यश आले नाही व सातत्याने नुकसान होत गेल्याने तो मानसिक तणावात होता. त्यामुळे आपल्याला घरचे रागावतील किंवा मारतील या भीतीने तो तणावात होता. त्यामुळे कंटाळून त्याने आपल्या राहत्या घरी (Home) गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान, तो आपल्या आई आणि दोन बहि‍णींसह (Mother and Sister) राहत होता. घरातील एकुलता एक आधार हरपल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उपनगर पोलीस ठाण्यात (Upnagar Police Station) याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची (Death) नोंद करण्यात आली असून, नातेवाईकांनी देखील स्पष्टपणे ऑनलाईन जुगारामुळे आत्महत्या केल्याचे सांगितले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राहुरीसह अन्य कृषी विद्यापीठांतील पद भरतीचा मार्ग मोकळा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्यातील कृषी विद्यापीठांच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी मिळाली आहे. तब्बल 23 वर्षांनंतर विद्यापीठांच्या अ आणि ब संवर्गातील एकूण 3,723 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता...