Saturday, November 21, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Crime News : गुन्ह्यांचे आरोप, गर्भावस्था अन् घटस्फोटाचा पेच; संसार वाचवण्यासाठी...

Nashik Crime News : गुन्ह्यांचे आरोप, गर्भावस्था अन् घटस्फोटाचा पेच; संसार वाचवण्यासाठी निदा खानचा व्हिसीद्वारे संघर्ष

१९ जानेवारीत तिसरे समुपदेशन

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

टीसीएस कंपनीतील (TCS Company) तरुणी व तरुणाच्या कथित धर्मांतर आणि अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यांत संशयित असलेल्या निदा एजाज खान (वय २६) हिच्या आयुष्यात आता नवा पेच निर्माण झाला आहे. गुन्ह्यांच्या तपासाचे आणि न्यायालयीन लढाईचे सावट असतानाच, सामाजिक बदनामी व नामुष्कीमुळे तिच्या पतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. एकीकडे गंभीर गुन्ह्यांचे आरोप, गर्भावस्था आणि सामाजिक दबाव; तर दुसरीकडे कोसळण्याच्या उंबरठ्यावर असलेला संसा, अशा दुहेरी कोंडीत सापडलेल्या निदाने संसार टिकवण्यासाठी ‘व्हिसी’ (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) माध्यमातून झालेल्या दुसऱ्या समुपदेशनातही लढा कायम ठेवल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

निदाच्या पतीने घटस्फोटासाठी नाशिकरोड येथील कौटुंबिक न्यायालयात (Nashik Road Family Court) अर्ज केला आहे. याप्रकरणी झालेल्या दुसऱ्या समुपदेशन सुनावणीदरम्यान निदा व्हिसीद्वारे उपस्थित राहिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीने घटस्फोटाची भूमिका घेतली असली, तरी निदा मात्र संसार वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. या दाम्पत्याचे पुढील समुपदेशन आता १९ जानेवारी रोजी होणार असून, त्यानंतर या प्रकरणातील पुढील कायदेशीर व कौटुंबिक कार्यवाही स्पष्ट होईल. कौटुंबिक न्यायालयातील या घडामोडींमध्ये निदाच्या वतीने अ‍ॅड. शोभा प्रकाश ताजनपुरे आणि अ‍ॅड. प्रकाश ताजनपुरे हे बाजू मांडत आहेत, तर तिच्या पतीच्या वतीने अ‍ॅड. नितीन पंडित युक्तिवाद करत आहेत.

गुन्ह्यांच्या (Crime) पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या तणावामुळे वैवाहिक नात्यात निर्माण झालेली दरी समुपदेशनातून मिटणार की घटस्फोटाकडे वळणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. मुंबई नाका पोलीस ठाण्यात याच कंपनीतील एका तरुणाच्या फिर्यादीवरून तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी, रझा मेमन यांच्यासोबत निदा खान हिच्यावरही गुन्हा नोंद आहे. २६ मार्चपासून सुरू झालेल्या या गंभीर गुन्ह्यांच्या मालिकेतील दोन्ही प्रकरणांमध्ये नाशिकरोड व नाशिक जिल्हा न्यायालयाने निदाला सशर्त जामीन मंजूर केला आहे.

​गुन्ह्यांची पार्श्वभूमी आणि जामीन

देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात बहुराष्ट्रीय कंपनीतील अविवाहित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित दानिश शेख, तौसिफ अत्तार, निदा खान यांच्यासह छत्रपती संभाजीनगर येथील ‘एमआयएम’चे नगरसेवक मतीन पटेल, घरमालक हानिफ शेख, निदाचे वडील एजाज बशिर खान, आई निलोफर एजाज खान, भाऊ महंमद एजाज खान, मावशी नुरजहा शेख, माजी खासदार इम्तियाज जलील आणि सादिक बशिर खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. निदा पसार असताना मतीन पटेल यांनी हानिफ शेख यांचे घर उपलब्ध करून देत तिला आश्रय दिल्याचा ठपका ठेवत त्यांनाही सहसंशयित करण्यात आले आहे.

​आयुष्याच्या नाजूक वळणावर कोंडी

एक बाजूला गंभीर गुन्ह्यांचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाच, दुसऱ्या बाजूला बदनामीमुळे पतीने उचललेले घटस्फोटाचे पाऊल निदासाठी अधिकच कसोटीचे ठरले आहे. गर्भावस्था, कायदेशीर लढाई, समाजाचा दबाव आणि संसार तुटण्याची भीती या सर्व गोष्टींच्या कोंडीत अडकलेल्या निदाच्या वैवाहिक भवितव्याचा फैसला आता जानेवारीतील समुपदेशनानंतरच होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : नाशिक-त्र्यंबक रोडवरील वाहतूक ‘या’ कालावधीत दिवसातून तीन वेळा...

0
नाशिक | Nashik आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या (Nashik-Trimbakeshwar Road) सहा पदरीकरणाचे काम सुरु आहे. एका बाजूचा रस्ता जवळपास पूर्णत्वास आला असून, उर्वरित दुसऱ्या...