Sunday, September 27, 2026
Homeक्राईमNashik Crime News : कट्टा एमपीचा अन् धमाका नाशिकमध्ये; पन्नास हजारांत कट्टा...

Nashik Crime News : कट्टा एमपीचा अन् धमाका नाशिकमध्ये; पन्नास हजारांत कट्टा विकणारे गुंडा विरोधी पथकाच्या जाळ्यात

पुण्यातही विक्री

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मध्य प्रदेशातून बेकायदेशिरपणे गावठी कट्टे (अग्निशस्त्रे) आणून नाशिक व पुणे शहरात (Nashik and Pune City) बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या टोळीचा नाशिक शहराच्या गुंडा विरोधी पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन ३ गावठी कट्टे आणि तीन जिवंत काडतुसांसह सुमारे दाेन लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. पंचवटीतील (Panchvati) हनुमानवाडी भागातील सराईत किरण सुकलाल केवर (वय २६) हा या बेकायदेशीर शस्त्र विक्रीचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे.  

- Advertisement -

घाडगे नगर (पंचवटी-मखमलाबाद रोड) येथील मोकळ्या जागेत ३ संशयित गावठी कट्टे (Katta) विक्रीसाठी येणार आसल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाचे अंमलदार कल्पेश जाधव यांना (दि. २६) मिळाली हाेती. या आधारे पथकाचे प्रभारी अधिकारी संदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली तीन पथके तयार करून सापळा रचण्यात आला.  वडजाई माता नगरसमोरील मोकळ्या जागेत संशयित किरण सुकलाल केवर (वय २६, रा. गोकुळधाम, हनुमानवाडी), प्रणव गणेश वराडे (वय २०, रा. कृष्णकुंज रो हाऊस, वडजाई माता नगर) व कुणाल महेंद्र चव्हाण (वय १९, रा. क्रांतीनगर, मखमलाबाद रोड) दिसताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडेतीन गावठी कट्टे आणि ३ जिवंत काडतुसे आढळून आली. पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchvati Police Station) आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण केवर हा पोलिसांच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार (Criminal) असून त्याला यापूर्वी तडिपार (हद्दपार) देखील करण्यात आले होते. न्यायालयाने सर्व संशयितांना पोलीस कोठडी सुनावली असून, आता या टोळीकडून कट्टे खरेदी करणाऱ्या खरेदीदारांचा शोध घेऊन त्यांचीही सखोल चौकशी केली जाणार आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे उपनिरीक्षक संदीप पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

​२०२३ मधील गोळीबाराशी कनेक्शन?

तपासादरम्यान मुख्य सूत्रधार किरण केवर याने आतापर्यंत मध्य प्रदेशातून एकूण ९ कट्टे आणल्याचे उघड झाले आहे. त्यापैकी ६ कट्ट्यांची नाशिक आणि पुणे शहरात विक्री केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यातील एक कट्टा सराईत गुन्हेगार किरण शेळके याला विकण्यात आला होता. याच कट्ट्याचा वापर करून शेळके याने सन २०२३ मध्ये राकेश कोष्टी याच्यावर गोळीबार केल्याचे तपासात निष्पन्न होत आहे.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला मिळाला सर्वाधिक भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 4800 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची 2558 गोण्यांची...