Monday, November 23, 2026
HomeनाशिकNashik FDA Action : हॉटेल यात्री, फिजी फॉक्सचे परवाने निलंबित; अन्न व...

Nashik FDA Action : हॉटेल यात्री, फिजी फॉक्सचे परवाने निलंबित; अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई

हॉटेल जनताचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) नाशिक शहरातील (Nashik City) तीन अन्न आस्थापनांवर कारवाई केली आहे. यामध्ये दोन आस्थापनांचे अन्न परवाने, तर एका आस्थापनेचे नोंदणी प्रमाणपत्र तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. तसेच मुंगसरे येथील एका हॉटेलमधून (Hotel) ३३ हजार रुपये किमतीची ११० किलो शेव जप्त करण्यात आली आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे, सहआयुक्त मंगेश माने तसेच सहायक आयुक्त (अन्न) विनोद धवड, ज्ञानेश्वर महाले आणि संदीप देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली २० नोव्हेंबर रोजी तपासणी करण्यात आली. त्यानंतर आज (सोमवार दि. २३ नोव्हेंबर) रोजी संबंधित आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

सीबीएस बसस्थानकाजवळील (CBS Bus Stand) मे. हॉटेल यात्री, मखमलाबाद शिवारातील मे. प्लॅथोपिया एंटरटेनमेंट एलएलपी (फिजी फॉक्स) आणि सीबीएस बसस्थानकाजवळील हॉटेल जनता या आस्थापनांचा कारवाईत समावेश आहे. तपासणीदरम्यान तिन्ही ठिकाणी अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा व मानके नियम २०११ मधील अनुसूची चारचे उल्लंघन आढळले. हॉटेल यात्रीमध्ये आवश्यक कागदपत्रांची (Document) पूर्तता नव्हती. फिजी फॉक्समध्ये अन्न तयार करण्याच्या ठिकाणी कीटकांचा प्रादुर्भाव तसेच मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळले. हॉटेल जनतामध्ये तयार अन्नपदार्थ उघड्यावर विक्रीसाठी ठेवल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान, पेरुची वाडी, गट क्रमांक ३७१, मुंगसरे येथील हॉटेलमधून लेबलमधील त्रुटी आणि कमी दर्जाचा संशय आल्याने ३३ हजार रुपये किमतीची ११० किलो शेव जप्त करण्यात आली. संबंधित पेढीला सुधारणा नोटीस बजावून १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. अन्न सुरक्षा अधिकारी गोविंदा गायकवाड, अश्विनी पाटील, ऋतुजा नवले आणि प्रतीक भड यांनी ही कारवाई केली. नागरिकांनी अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत तक्रार असल्यास complaints.mahafda.in या संकेतस्थळावर नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

ताज्या बातम्या

राजकीय

मोठी बातमी! राजकीय पक्षांतराला चाप बसणार? केंद्र, निवडणूक आयोग आणि विधी...

0
नवी दिल्ली | New Delhiराजकीय फायद्यासाठी पक्ष बदलणाऱ्या आणि अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी राजीनाम्याचा मार्ग स्वीकारणाऱ्या आमदार-खासदारांसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक...