Saturday, November 21, 2026
Homeक्राईमNashik Crime News : अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; चार हॉटेलसह...

Nashik Crime News : अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; चार हॉटेलसह एका कॅफेचे नोंदणी प्रमाणपत्र निलंबित

नाशिक | Nashik

शहरातील चार नामांकित हॉटेल आणि एक कॅफे (Hotel and Cafe) अशा एकूण पाच आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाई (Action) करत त्यांचे अन्न नोंदणी प्रमाणपत्र तत्काळ निलंबित केले आहे. या कारवाईत काही मिसळ हॉटेलचा देखील समावेश असून, यामुळे हॉटेल व्यावसायिकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

- Advertisement -

कोणत्या आस्थापनांवर झाली कारवाई?

अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शहरातील हॉटेल विहार (जुना गंगापूर नाका, वूडलॅण्ड टॉवर), हॉटेल श्यामसुंदर (सातपूर एमआयडीसी), हॉटेल तुषार मिसळ (मलेरिया स्टॉपजवळ, कॉलेज रोड), हॉटेल महाराजा काठियावाडी (आडगाव फाटा, पंचवटी) आणि दुर्गा कॅफे (कृषी नगर,कॉलेज रोड) या पाच आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे.

कोणी केली कारवाई?

अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) सह आयुक्त मंगेश माने साहेब तसेच सहायक आयुक्त (अन्न) विनोद धवड आणि ज्ञानेश्वर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी अश्विनी पाटील, ऋतुजा नवले, प्रतीक भड, किशोर चांदगुडे आणि संकेत येलमामे यांनी केली असून, अन्न सुरक्षिततेच्या दृष्टीने पुढेही अशीच मोहीम सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

कारवाईमागील प्रमुख त्रुटी

हॉटेल विहार : अस्वच्छ परिस्थितीसह अन्न तयार करण्याच्या ठिकाणी कीटक आणि इतर उपद्रवी जिवांचा प्रादुर्भाव आढळून आला.
हॉटेल श्यामसुंदर : अनुसूची-४ मधील तरतुदींचे उल्लंघन, कच्चा माल अस्वच्छ परिस्थितीत साठवणे तसेच स्वयंपाकघराच्या रचना व बांधकामविषयक अटींचा भंग झाल्याचे निदर्शनास आले.
हॉटेल तुषार मिसळ : अस्वच्छ परिस्थिती, अन्न साठवणुकीसाठी अपुरी जागा आणि मुदतबाह्य अन्नपदार्थ साठवलेले आढळले.
हॉटेल महाराजा काठियावाडी : अनुसूची-४ मधील तरतुदींचे उल्लंघन, अस्वच्छता, स्टोअररूममध्ये उंदरांची विष्ठा, मुदतबाह्य अन्नपदार्थ तसेच धूळ व कीटकांचा प्रवेश रोखण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याचे आढळून आले.
कॅफे दुर्गा कॅफे : अनुसूची-४ चे उल्लंघन, अस्वच्छ परिस्थिती, ग्राहकांना दिलेल्या बिलांवर एफएसएसएआय (FSSAI) परवाना क्रमांक नसणे आणि मेनू कार्डावर स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या माध्यमांचा उल्लेख नसल्याचे समोर आले.

ताज्या बातम्या

Nashik News : नाशिक-त्र्यंबक रोडवरील वाहतूक ‘या’ कालावधीत दिवसातून तीन वेळा...

0
नाशिक | Nashik आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या (Nashik-Trimbakeshwar Road) सहा पदरीकरणाचे काम सुरु आहे. एका बाजूचा रस्ता जवळपास पूर्णत्वास आला असून, उर्वरित दुसऱ्या...