Tuesday, October 20, 2026
Homeक्राईमNashik Crime News : खरात खटल्याची सुनावणी वेगाने; नाशिकसह विविध भागात एकूण...

Nashik Crime News : खरात खटल्याची सुनावणी वेगाने; नाशिकसह विविध भागात एकूण १८ गंभीर गुन्हे दाखल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

तरुणींसह उच्चभ्रू कुटुंबातील महिलांना दैवी शक्ती, मंत्र-तंत्र आणि भविष्याची भीती दाखवून लैंगिक अत्याचार करणाऱ्या स्वयंघोषित भोंदू अशोककुमार एकनाथ खरात उर्फ ‘कॅप्टन’ याच्याविरुद्धच्या कायदेशीर कारवाया आता निर्णायक टप्प्यावर पोहोचल्या आहेत. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात (Nashik District Sessions Court) दाखल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात सोमवारी (दि. १७) पाचवी सुनावणी पार पडली. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात (Nashik Road Central Jail) असलेल्या खरातला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हीसी) न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सध्या न्यायालयात दोषारोपपत्राच्या पडताळणीची प्रक्रिया सुरू असून, या खटल्याची पुढील सुनावणी (Hearing) आता ३१ ऑगस्ट रोजी होणार आहे.

- Advertisement -

​संशयित खरातविरोधात नाशिकसह (Nashik) विविध भागात एकूण १८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये ८ गुन्हे हे थेट महिलांवरील अत्याचाराचे असून, उर्वरित गुन्हे फसवणूक, जादूटोणा विरोधी कायदा आणि बेकायदेशीर सावकारीशी संबंधित आहेत. विशेष म्हणजे, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार २० मार्चपासून विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. एसआयटीने गतीने तपास करत नाशिक सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. यात सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या पहिल्या गुन्ह्यात तब्बल १०५ साक्षीदारांचे जबाब नोंदवून खरातच्या अडचणीत वाढ केली आहे.

तपासाचे वैशिष्ट्ये व मुद्दे

  • पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते, उपअधीक्षक अमोल भारती आणि किरणकुमार सूर्यवंशी यांच्यासह २४ अधिकाऱ्यांचे पथक ११ गुन्ह्यांचा तपास सुरु
  • ​खटल्याची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांच्यासह अहिल्यानगरचे परिमल फळे यांची नियुक्ती.
  • ​पोलीसच नव्हे, तर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) देखील खरातसह त्याच्या पाच सहकाऱ्यांवर गुन्हा नोंद आहे.
  • मुंबईतील विशेष न्यायालयात आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँक निवडणूक; ‘मनोमिलन’ की ‘सीमोल्लंघन’?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजकीय नेत्यांच्या हालचालींना वेग आला असतानाच विधान परिषदेचे सभापती तथा भाजपचे नेते राम शिंदे यांनी पुन्हा एकदा...