Friday, September 11, 2026
Homeक्राईमNashik MHADA Land Scam : म्हाडा खटल्याचे 'काऊंटडाऊन'; दोषारोप पत्राच्या प्रतीसाठी अर्जच...

Nashik MHADA Land Scam : म्हाडा खटल्याचे ‘काऊंटडाऊन’; दोषारोप पत्राच्या प्रतीसाठी अर्जच नाही

दाेन सप्टेंबरला पुढील सुनावणी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्यात गाजलेल्या नाशिकमधील म्हाडा जमीन फसवणूक घोटाळ्याचा (MHADA Land Scam) खटला अखेर नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात (Nashik District Court) सुरू झाला आहे. सोमवारी (दि. २७) या खटल्याची पहिली सुनावणी (Hearing) पार पडली. मात्र, पहिल्याच दिवशी संशयितांच्या वतीने वकिलांनी चार्जशीटच्या प्रती मिळवण्यासाठी अर्ज सादर केला नसल्याची माहिती समोर आली आहे. आता पुढील सुनावणी २ सप्टेंबर रोजी होणार आहे.

- Advertisement -

म्हाडाच्या जमिनींवरील (MHADA Land) आरक्षणात झालेल्या बनावटगिरीबाबत मार्च महिन्यांपासून नाशिक पोलिस आयुक्तालयाचे विशेष तपास पथक (एसआयटी) तपास करीत आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत विकासक संशयित दिनेश कन्हैय्यालाल उर्फ सोनू मनवानीला, बांधकाम व्यावसायिक दीपक भगवानदास करमचंदानी, नायब तहसीलदार नितीन पाटील यांना अटक झाली होती. तसेच या घोटाळ्यातील फिर्यादी भूमि अभिलेख विभागातील उपअधीक्षक संशयित बिपीन काजळे आणि नगर रचना विभागाचा सहाय्यक संचालक कल्पेश पाटील, भूमापन परीक्षक श्रीकांत परदेशी यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. हे सर्वजण न्यायालयीन कोठडीनंतर जामीनावर सध्या नाशिकरोड कारागृहाबाहेर आहे.

दरम्यान, संशयित शासकीय अधिकाऱ्यांनी कार्यालयात (Office) बसून बनावट नकाशे तयार करणे, खोट्या स्वाक्षऱ्यांसह बनावट शिक्के मारल्याचे तपासात समोर आले आहे. या खटल्यात न्यायालयात दाखल दोषारोप पत्रातील संशयितांच्या नावांमध्ये नामांकित बांधकाम व्यावसायिक, माजी नगरसेवकांसह राजकीय पुढाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे या गुन्ह्याच्या व्याप्ती वाढत असून अटकपूर्व मिळालेल्या काही संशयितांच्या अडचणीत पुन्हा वाढ होणार आहे. सबळ पुराव्यांनुसार टप्प्याटप्प्याने आणखी दोषारोप पत्र दाखल होणार असल्याचे कळते.

ताज्या बातम्या

संपादकीय : ११ सप्टेंबर २०२६ – विद्यार्थ्यांचा आक्रोश कोणी ऐकेल काय?

0
महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या पुणे शहरासह संपूर्ण राज्यामध्ये आज स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीमुळे एक अभूतपूर्व आणि चिंताजनक जनक्षोभ उसळला आहे. नीट परीक्षेपासून सुरू...