Tuesday, September 1, 2026
Homeक्राईमNashik Crime News : माेक्याच्या जमिनीवर कब्जा अन् ५ कोटींची खंडणी; सद्दाम...

Nashik Crime News : माेक्याच्या जमिनीवर कब्जा अन् ५ कोटींची खंडणी; सद्दाम शेख पोलिसांच्या जाळ्यात, आईवरही गुन्हा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी शहर पोलिसांवर (City Police) आरोप करून चर्चेत आलेला संशयित सद्दाम शेख आता गंभीर गुन्ह्यात (Case) अडकला आहे. के. के. वाघ ॲग्रीकल्चर कॉलेजसमोरील कोट्यवधी रुपये मूल्याच्या जमिनीवर बेकायदेशीर ताबा मारून मूळ मालकाकडे तब्बल ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात संशयित सद्दाम बाबू शेखसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समर्थ नगर येथील व्यावसायिक श्रीकांत मधुकर कुलकर्णी यांची धात्रक फाटा येथील रासबिहारी रोड परिसरात ८ हजार ६२५ चौरस मीटरची मोक्याची जमीन आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कुलकर्णी या जागेवर ले-आऊट विकसित करत आहेत. मार्च २०२५ मध्ये कुलकर्णी आपल्या मुलासह जागेवर गेले असता, संशयित सद्दाम बाबू शेख, लता भिका बर्डे आणि राजाराम केशव गटकळ यांनी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या (Fake Documengt) आधारे जागेवर कब्जा केल्याचे निदर्शनास आले. जागा मोकळी करण्याची विनंती केली असता, संशयितांनी ५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करत कुलकर्णी व त्यांच्या मुलाला मारहाण केली.

कुलकर्णी यांना जमिनीवर पाडून त्यांच्या मानेवर पाय ठेवला आणि जीवे मारण्याची धमकी देत खिशातील एक लाख रुपये काढून घेतले. उर्वरित पैसे न दिल्यास संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची तसेच खोट्या ‘ॲट्रॉसिटी’ गुन्ह्यात अडकवण्याची धमकी सातत्याने दिली, असे फिर्यादीत नमूद आहे. ​या त्रासाला कंटाळून श्रीकांत कुलकर्णी यांनी अखेर पोलिसांत धाव घेतली. आडगाव पोलिसांनी सद्दाम शेख, लता बर्डे आणि राजाराम गटकळ यांच्याविरुद्ध बेकायदेशीर घुसखोरी, जबरदस्तीने खंडणी उकळणे, बनावट कागदपत्रे तयार करणे, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

​’बळीचा आव’ उघडा?

या गुन्ह्यातील मुख्य संशयित सद्दाम शेख याने गेल्या काही दिवसांपासून शहर पोलिसांवर सातत्याने आरोप करत रान उठवले होते. पोलिसांनी घरझडतीच्या बहाण्याने त्रास दिला तसेच कार्यालयात बेकायदेशीर बसवून ठेवले, असा दावा त्याने केला होता. मात्र, आता कोट्यवधींच्या जमिनीवर डाका मारून ५ कोटींची खंडणी उकळण्याचा प्रकार समोर आल्याने सद्दाम शेखचा ‘बळीचा आव’ उघडा पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मुद्दे

  • कोट्यवधींच्या जमिनीवर कब्जा अन् ५ कोटींची खंडणी
  • संशयित ‘तोच’ सद्दाम शेख!
  • रासबिहारी रोडवरील ८ हजार ६२५ चौ.मी. जागेचा वाद
  • जमिनीवर पाडून मानेवर पाय ठेवला; खिशातील १ लाख उकळले
  • कुटुंबाला संपवण्याची अन् ‘ॲट्रॉसिटी’त अडकवण्याची धमकी
  • ​आडगाव पोलिसांत मायलेकासह तिघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का? 14 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; ‘ऑपरेशन...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची दारे उघडल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. फुटीचे आणि राजकीय उलथापालथीचे केंद्र...