Tuesday, September 1, 2026
Homeनगरअवैध मावा-गुटखा विक्रीवर एलसीबीचा छापा; ३.१८ लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध मावा-गुटखा विक्रीवर एलसीबीचा छापा; ३.१८ लाखांचा मुद्देमाल जप्त

राहुरी (प्रतिनिधी)

- Advertisement -

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध मावा, गुटखा आणि सुगंधित तंबाखूची विक्री करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) धडक कारवाई केली. मिरजगाव, नेवासा, राहाता आणि राहुरी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आठ ठिकाणी छापे टाकून ३ लाख १८ हजार २८४ रुपयांचा मुद्देमाल जाप्त करण्यात आला. या कारवाईत १३ जणांविरुद्ध ८ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी चार पथके तबार करून अवैध गुटखा, मावा व सुगंधित तंबाखू विक्री करणान्यांची माहिती संकलित करण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार ३० ऑगस्ट रोजी एलसीबीच्या पथकांनी मिरजगाव, नेवासा, राहाता आणि राहुरी परिसरात कारवाई केली. कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे तीन कारवायांत धनंजय बसंत सातब रा. पीरसाहेब गल्ली, मिरजगाव, दादा नारायण गदादे (फरार) रा. गुरवपिंप्रीरोड, मिरजगाव आणि सागर हनुमंत गोरे रा. गोरेमळा, गॉधडीरोड मिरजगाव यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवायांमध्ये अनुक्रमे ८ हजार २४०, १४ हजार आणि ५८ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जान करण्यात आला.

नेवासा तालुक्यातील कुकाणा परिसरात दोन ठिकाणी छापे टाकण्यात आले. बाळासाहेब रावसाहेब जावळे रा. बाजारतळ कुकाणा, बाबु उर्फ बबलू पठाण रा. शेवगाव, अबरार रशीद शेख रा. देवगावरोड कुकाणा आणि आसिफ तांबोळी (फरार) रा. शेवगाव यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. या दोन्ही कारवायांत अनुक्रमे १४ हजार व १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

राहाता येथे शनिमंदिर रोड, मेहेत्रेनगर परिसरात कारवाई करून इम्रान शफी तांबोळी, जमीर शफी तांबोळी आणि पापाभाई नजीर शेख रा. शनिमंदिर रोड, मेहेत्रेनगर, राहाता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, त्यांच्याकडून ३१ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, राहुरीत दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली. बाबासाहेब भाऊराव गागरे रा. म्हैसगाव ता. राहुरी व पवन गिरासे (फरार) रा. राहुरी यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यात २६ हजार ४९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, तर दुसऱ्या कारवाईत पवन उर्फ पृथ्वीराज दगडुसिंग गिरासे रा. राहूरी याच्याकडून तब्बल १ लाख ४७ हजार ५५२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या सर्व कारवायांमध्ये भारतीय न्याय संहितेतील (बीएनएस) कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच ३(५) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फरार आरोपींचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे, कृष्णकुमार सेंदवाड तसेच एलसीबीच्या पथकातील पोलीस अंमलदार अरूण गांगुर्डे, रोहित मिसाळ, मनोज साखरे, भाऊसाहेच काळे, प्रकाश मांडगे, दिपक जाधव, बाळासाहेब नागरगोजे, सोमनाथ झांबरे, अभिजीत अरकल, विष्णु भागवत, अशोक लिपणे, किशोर शिरसाठ, बिजय पवार, रिचर्ड गायकवाड, राहुल डोके, भगवान थोरात, सुनिल पवार, शाहीद शेख, भिमराज खसें, विशाल तनपुरे, आजिनाथ पाखरे, अमृत आढाव, व महिला पोलीस अंमलदार ज्योती शिंदे यांनी केली.

ताज्या बातम्या

Rahul Gandhi : काँग्रेस खासदार राहुल गांधी उद्या नाशिक दौऱ्यावर; आदिवासी...

0
नाशिक | Nashik काँग्रेस पक्षाच्या (Congress Party) 'संघटन सृजन अभियाना'अंतर्गत गेल्या दहा दिवसांपासून नाशिकमध्ये (Nashik) राज्यातील ७८ जिल्हाध्यक्षांचे निवासी प्रशिक्षण शिबीर सुरू आहे. या शिबीराच्या...