Saturday, November 14, 2026
Homeक्राईमNashik Crime News : पत्नी असतानाही अल्पवयीन मुलीला पळवून नेले! तिरुपती-अक्कलकोटसह चार...

Nashik Crime News : पत्नी असतानाही अल्पवयीन मुलीला पळवून नेले! तिरुपती-अक्कलकोटसह चार राज्यांत फिरवणारा तरुण जाळ्यात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

​विवाहित असूनही १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या मुंबईतील (Mumbai) ३४ वर्षीय तरुणाला नाशिक शहर गुन्हे शाखेच्या (अंबड युनिट-३) पथकाने नाशिकरोड रेल्वे स्थानकावरून सापळा रचून अटक केली आहे. तब्बल १३ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या मुलीची (Girl) सुटका करण्यात पोलिसांना यश आले असून, संशयिताने तिला तिरुपती बालाजीसह विविध तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडविल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

- Advertisement -

प्रशांत ऊर्फ रवी गायकवाड (वय ३४, रा. पोस्टल कॉलनी, चेंबूर पूर्व, मुंबई) असे अटकेतील संशयिताचे (Suspected) नाव आहे. चेंबूर पूर्व परिसरात परिसरात राहणारी १६ वर्षे ८ महिने वयाची मुलगी माटुंगा येथील एका महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिकते. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी महाविद्यालयाची परीक्षा आटोपून ती घरी परतली. त्यानंतर शेजारीच राहणाऱ्या आजीच्या घरी जेवण केल्यानंतर ती अचानक बेपत्ता झाली. विशेष म्हणजे, तिने मोबाईल फोन घरीच ठेवला असल्याने तिचा शोध घेणे कुटुंबीयांसाठी (Family) आव्हान ठरले होते. पालकांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतर ३१ ऑक्टोबर रोजी चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.  

देवदर्शनाच्या नावाखाली चार राज्यांत प्रवास

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, संशयित प्रशांत गायकवाड हा पीडित मुलीच्या नातलगांच्या घरालगतच्या परिसरात राहणारा असून तो विवाहित आहे. त्याला पहिली पत्नी असतानाही त्याने या अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून आणि फूस लावून आपल्यासोबत पळवून नेले. ३० ऑक्टोबरपासून त्याने तिला आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी, कोल्हापूर, अक्कलकोट (सोलापूर), गाणगापूर आणि ओडिशातील जगन्नाथ पुरी अशा विविध तीर्थक्षेत्री फिरवल्याचे निष्पन्न झाले आहे.

​असा लागला सुगावा

अपहृत मुलगी नाशिकरोड रेल्वे स्थानक (Nashik Road Railway Station) परिसरात असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा अंबड युनिट तीनचे उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना मिळाली. त्यानुसार पथकाने गुरुवारी (दि. १२) रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचला. पोलीस अंमलदार गौरव धात्रक यांनी मुलीला अचूक ओळखल्यानंतर महिला पोलिसांच्या मदतीने तिला ताब्यात घेतले. तिच्यासोबत असलेल्या प्रशांत गायकवाड यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. दोघांनाही मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत, उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.  

ताज्या बातम्या

Under 19 Asia Cup Final : पाकिस्तानचे भारतासमोर ३३८ धावांचे आव्हान;...

0
नवी दिल्ली | New Delhi अंडर-१९ आशिया कप २०२६ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात (Aisa Cup Final) पाकिस्तानने भारतासमोर (Team India) विजयासाठी ३३८ धावांचे तगडे आव्हान उभे...