Tuesday, October 27, 2026
Homeक्राईमNashik Crime News : एटीएस निरीक्षकालाच सहसंशयित करा; संशयित शिरसाठच्या वकिलांचा गंभीर...

Nashik Crime News : एटीएस निरीक्षकालाच सहसंशयित करा; संशयित शिरसाठच्या वकिलांचा गंभीर दावा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

ओझर येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) मधील संवेदनशील आणि गोपनीय माहिती पाकिस्तानातील महिला एजंटला पुरवल्याप्रकरणी बहुचर्चित असलेल्या हेरगिरी आणि हनी ट्रॅप प्रकरणाला सोमवारी (दि. २६) एक नाट्यमय वळण मिळाले. संशयित दीपक श्रावण शिरसाठ याच्या वकिलांनी न्यायालयात एक खळबळजनक अर्ज दाखल करत, या प्रकरणात एका एटीएस (आतंकवादविरोधी पथक) पोलीस निरीक्षकावरच न्यायालयाची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच, संबंधित पोलिस निरीक्षकालाही या खटल्यात संशयित म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

या अर्जाची न्यायालयाने गंभीर दखल घेऊन सरकारी पक्षाचे म्हणणे मागवले असून, या प्रकरणावरील पुढील सुनावणी पुढील २ नोव्हेंबर रोजी निश्चित करण्यात आली आहे. एचएएलचा तत्कालीन कर्मचारी असलेला दीपक शिरसाठ याला हेरगिरी आणि हनी ट्रॅपच्या गुन्ह्याखाली ८ ऑक्टोबर २०२० रोजी अटक करण्यात आली होती. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता व दीर्घकालीन कारावास तसेच जलद खटला चालवण्याच्या संविधानिक अधिकाराचा विचार करत मुंबई उच्च न्यायालयाने काही काळापूर्वी त्याला जामीन मंजूर केला होता. ​

या प्रकरणाची सुनावणी आता सत्र न्यायालयात सुरू असून, २०२२ मध्येच संशयिताविरुद्ध दोषारोप निश्चित झाले होते. त्यानंतर सोमवारी (दि. २६) खटल्यातील पुरावे तपासणीच्या फेरीत एकूण ५९ साक्षीदारांपैकी ८ व्या क्रमांकाच्या साक्षीदाराची साक्ष न्यायालयात अधिकृतपणे नोंदवण्यात आली. याच सुनावणीदरम्यान संशयिताच्या वकिलांनी एटीएसच्या संबंधित अधिकाऱ्यावर आक्षेप घेत दाखल केलेल्या अर्जामुळे खटल्याला आता नवीे वळण लागले आहे.

नेमके प्रकरण काय?

​पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या हेरगिरीच्या जाळ्यात ओढल्या गेलेल्या या प्रकरणाची व्याप्ती अत्यंत देशविघातक स्वरूपाची आहे. पाकिस्तानी महिला एजंटने बनावट स्त्री सोशल मीडिया खात्याचा वापर करून एचएएलचा कर्मचारी दीपक शिरसाठ याला जाळ्यात ओढले होते. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सातत्याने संपर्क साधत त्याला या गोपनीय जाळ्यात अडकवण्यात आले. शिरसाठ याने एचएएलमधील अत्यंत प्रतिबंधित क्षेत्र, लढाऊ विमानांचे सुटे भाग, सुरक्षितता व्यवस्था, तसेच भारतीय वायूदलाच्या सुखोई विमानांसह इतर लढाऊ विमानांशी संबंधित क्षेपणास्त्रे आणि प्रक्षेपकांची गोपनीय तांत्रिक माहिती, फोटो आणि व्हिडिओ परदेशात पाठवल्याचा गंभीर आरोप आहे.

​जप्त केलेले पुरावे

एटीएसच्या कारवाईदरम्यान संशयिताकडून ३ मोबाईल, ५ सिमकार्ड्स आणि २ मेमरी कार्ड्स जप्त करण्यात आले होते. सामान्य कर्मचाऱ्यांनाही सहज उपलब्ध नसलेली अत्यंत संवेदनशील आणि गोपनीय माहिती शिरसाठने समाजमाध्यमांद्वारे परदेशातील सहसंशयिताला पुरवल्याचे तांत्रिक व दस्तऐवजी पुरावे तपास यंत्रणेने न्यायालयात सादर केले आहेत.

ताज्या बातम्या

MLC Election 2026 : नागपूरात मतपत्रिकांवरून आक्षेप, अमरावतीत ‘जुनी पेन्शन’चा मजकूर;...

0
मुंबई | Mumbai महाराष्ट्र विधानपरिषद शिक्षक आणि पदवीधर अशा पाच मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज (मंगळवारी) सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीस (Vote Counting) सुरुवात झाली आहे. टपाली मतांच्या...