Wednesday, September 30, 2026
Homeक्राईमNashik Crime News : घरफोडीत सोन्या-चांदीसह रोख रक्कम लंपास

Nashik Crime News : घरफोडीत सोन्या-चांदीसह रोख रक्कम लंपास

जेलरोड| प्रतिनिधी | Jail Road

वडनेर रोड परिसरातील (Wadner Road Area) योगेश्वर नगर, विहितगाव येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सुमारे १ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात (Upnagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Rupali Chakankar : नाशिकमध्ये SIT कडून रुपाली चाकणकरांची कसून चौकशी; अशोक खरात प्रकरणावर दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणपत काशिनाथ साबळे (वय ४७, रा. योगेश्वर नगर, विहितगाव, वडनेर रोड, नाशिक) हे ४ मे रोजी सायंकाळी घर (House) बंद करून बाहेर गेले होते. ९ मे रोजी सकाळी घरी परत आल्यानंतर घराच्या दरवाज्याचे कडी-कोयंडे तुटलेले दिसून आले. घरात प्रवेश करून पाहणी केली असता अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याचे निदर्शनास आले.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : खरातशी बिल्डरांचे लागेबांधे; काळा पैसा पांढरा करण्याचा डाव

दरम्यान, चोरीमध्ये (Stolen) सुमारे ६० हजार रुपये किमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत व नथ, ५ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने तसेच ५० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे.या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : नाशिकमध्ये पुन्हा तिहेरी तलाक; पोटच्या गोळ्याचा मृत्यू अन् पत्नीला फोनवरून दिला काडीमोड

ताज्या बातम्या

Nashik News : नाशिकमध्ये पुन्हा रस्ते खोदणार; मिळाली ‘इतक्या’ दिवसांची परवानगी

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik सिंहस्थाच्या (Simhstha) कामांसह विविध विकासकामांसाठी झालेली खोदकामे आणि खड्ड्यांमुळे शहरातील रस्त्यांची (Roads) झालेली वाताहत लक्षात घेता पावसाळ्यापर्यंत थांबविण्यात आलेली रस्ते...