Tuesday, June 23, 2026
Homeक्राईमNashik Crime News : अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी...

Nashik Crime News : अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करून बेकरी व्यावसायिकांची फसवणूक; तिघांना अटक

ओझे l वार्ताहर | Oze

नाशिक शहरात (Nashik City) अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याची खोटी बतावणी करून बेकरी व्यावसायिकांकडून पैसे उकळणाऱ्या तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तिन्ही संशयितांना (Suspected) अटक (Arrsted) केली आहे. त्यांना आज (सोमवारी) न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisement -

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, १९ जून रोजी सकाळी कारगिल चौक, दत्तनगर परिसरातील एका बेकरीमध्ये दोन पुरुष आणि एक महिला आले. त्यांनी स्वतःला अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याचे सांगत बनावट ओळखपत्र दाखवले. त्यानंतर दुकानातील खाद्यपदार्थांचे फोटो आणि व्हिडिओ चित्रीकरण करून बेकरीचा परवाना रद्द करण्याची तसेच व्यवसाय बंद पाडण्याची धमकी दिली.

या धमकीच्या आधारे संबंधित व्यावसायिकाकडून १५ हजार रुपये रोख तसेच ३ हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने उकळल्याचा आरोप आहे. याच दिवशी दुपारी द्वारका परिसरातील आणखी एका व्यावसायिकालाही खाद्यपदार्थांमध्ये भेसळ असल्याची भीती दाखवून १५ हजार रुपये उकळण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी रिजवान इब्राहिम खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रोशन चांगदेव गव्हाणे (रा. महाकाली चौक, सिडको), विजय चुनीलाल बागूल आणि राजनंदिनी उर्फ रागिणी संतोष अहिरे (रा. जेलरोड, नाशिकरोड) यांच्याविरुद्ध फसवणूक व खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणातील दोघे संशयित एका खासगी लोकल न्यूज चॅनेलशी संबंधित कॅमेरामन व प्रतिनिधी असल्याची, तर महिला आरोपी एका संस्थेची पदाधिकारी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे (MIDC Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

ताज्या बातम्या

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसाला नोकरी देण्याबाबतचा प्रस्ताव तयार – वनमंत्री...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai राज्यात वन्याप्राण्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या वारसाला कायमस्वरुपी नोकरी देण्याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे. मंत्रिमंडळ बैठकीतील मंजुरीनंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल,...