Tuesday, October 20, 2026
Homeक्राईमNashik Crime News : जाब विचारल्याच्या रागातून गोळीबार; दाेन्ही संशयितांच्या शोधासाठी तीन...

Nashik Crime News : जाब विचारल्याच्या रागातून गोळीबार; दाेन्ही संशयितांच्या शोधासाठी तीन पथके रवाना

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पत्नीच्या (Wife) छेडछाडीचा आणि पाठलागाचा जाब विचारल्याचा राग मनात धरून, पाळत ठेवून पतीवर थेट जीवघेणा गोळीबार केल्याची घटना आडगाव शिवारामध्ये घडली हाेती. सुदैवाने हल्लेखोरांचे दोन्ही नेम चुकल्याने फिर्यादी या हल्ल्यातून बालंबाल बचावला.. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात (Aadgaon Police Station) गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पसार झालेल्या दोन संशयितांच्या मागावर पोलिसांची (Police) तीन विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

- Advertisement -

​आडगाव शिवारातील माळोदे वस्ती येथे राहणारे केशव रमेश माळोदे (वय ३१, धंदा शेती) हे या प्रकरणातील फिर्यादी आहेत. त्यांची पत्नी आणि मुख्य संशयित राहुल सोमनाथ आंबेकर (रा. राजराजेश्वरी मंगल कार्यालयाजवळ, जेलरोड) हे एकाच ठिकाणी कामाला आहेत. कामाच्या ठिकाणी राहुल आंबेकर हा वारंवार बाेलण्याचा प्रयत्न, छेडछाड तसेच पाठलाग करत असल्याची माहिती पीडितेने पतीस दिली होती. या प्रकारामुळे संतापलेल्या केशव माळोदे यांनी काही महिन्यांपूर्वी संशयित आंबेकर याच्या घरी जाऊन कुटुंबासमक्ष हा माझ्या पत्नीला त्रास देतोय, अशी तक्रार करुन समज दिली होती. ​घरी येऊन दिलेली समज आणि विरोध केल्याचा राग संशयित राहुल आंबेकरच्या डोक्यात होता.

याच वैमनस्यातून रविवारी (दि. १८) दुपारी पावणेदोनच्या सुमारास फिर्यादी केशव माळोदे हे आडगाव टी पाॅइंटजवळील महाराजा हॉटेलकडून खंडेराव महाराज मंदिरामार्गे पुलाखालून मोटारसायकलवरून घरी जात होते, तेव्हा संशयितांनी त्यांची वाट अडवली. दुचाकी चालवणारा अनोळखी व्यक्ति (वय अंदाजे ३५ ते ३८) तर त्याच्या मागे संशयित राहुल आंबेकर होता. राहुल आंबेकरने माळाेदे यांच्या दिशेने येत, घरी जाऊन तक्रार केल्याचे तसेच पत्नीस कामावर जाण्यास बंदी घातल्याचे कारण पुढे करत जिवे मारण्याच्या उद्देशाने दोन राऊंड फायर केले. मात्र, दोन्ही वेळा नेम चुकल्याने केशव माळोदे हे बचावले. यानंतर दोन्ही संशयित (Suspected) मोटारसायकलवरून पसार झाले.

​पोलिसांची कारवाई, तपासाची दिशा

​या प्रकरणी फिर्यादी केशव रमेश माळोदे यांच्या फिर्यादीवरून आडगाव पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०९, ३(५) तसेच हत्यार कायदा कलम ३/२५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या दोन्ही संशयित पसार असून, त्यांना लवकरात अटक करण्यासाठी पोलिसांची तीन पथके सिन्नर, येवला, मुंबई येथे रवाना झाली आहेत.


ताज्या बातम्या

शिंदे

एकनाथ शिंदेंनी भाजपकडून ५०० कोटी घेतल्याचा जरांगेंचा दावा…; शिंदे सेनेकडून पहिली...

0
मुंबई | Mumbaiबीडच्या नारायण गडावर आज मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांचा दसरा मेळावा पार पडला. दसऱ्या मेळाव्यातील या भाषणातून मनोज जरांगे यांनी विविध...