Sunday, September 13, 2026
Homeक्राईमNashik Crime News : व्यापाऱ्यांना 'बिश्नोई गँगची धमकी; आंतरराष्ट्रीय कॉलमुळे 'अंडरवर्ल्ड' कनेक्शनची...

Nashik Crime News : व्यापाऱ्यांना ‘बिश्नोई गँगची धमकी; आंतरराष्ट्रीय कॉलमुळे ‘अंडरवर्ल्ड’ कनेक्शनची चर्चा

नाशकात तपासाला वेग

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महात्मा गांधी राेडवरील क्रीडा साहित्य व वाद्य विक्रेते बंधूंना २ कोटी रुपयांची खंडणी मागून हत्येची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय क्रमांकांचा वापर आणि ‘लॉरेन्स बिश्नोई गँग’सह (Bishnoi Gang) संशयित शुभम लोणकर या नावाचा उल्लेख झाला आहे. 

- Advertisement -

​गुन्ह्याची पद्धत पाहता, हा केवळ स्थानिक गुन्हेगारांचा खोडसाळपणा आहे की बिश्नोई गँगचा उत्तर महाराष्ट्रातील (Uttar Maharashtra) व्यापाऱ्यांवर वचक बसवण्याचा हा प्रयत्न या अँगलने सरकारवाडा पोलीस तपास करत आहेत. १८ व १९ ऑगस्ट रोजी आलेले कॉल ऑस्ट्रेलियासह इतर आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून करण्यात आले आहेत. संशयितांनी ट्रॅकिंग टाळण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केल्याने सायबर पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. नाशिकमधील हा पहिला कॉल असून पैसे न दिल्यास पहिला खून तुमचा होईल,” अशी धमकी देण्यात आली. ​

सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) संशयित शुभम लोणकर आणि त्याच्या साथीदारांविरोधात भादंविच्या खंडणी विरोधी कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा (Case) दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्तालयासह गुन्हे शाखेच्या विशेष पथकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, खरोखरच आंतरराष्ट्रीय गँगचा यात हात आहे की ‘व्हर्च्युअल नंबर’चा वापर करून कोणती स्थानिक टोळी ही खंडणी उकळण्याचा प्रयत्न करत आहे, या दोन्ही बाजूंनी तपास सुरु आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात आतापर्यंत अवघा 22 दिवसच पाऊस

0
अहिल्यानगर | ज्ञानेश दुधाडे | Ahilyanagar नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात पडणार्‍या पावसात 40 दिवसांपेक्षा अधिकचा खंड पडला आहे. जिल्ह्यात जूनपासून आतापर्यंत गेल्या चार महिन्यांत अवघा...