Saturday, September 14, 2024
Homeनाशिकनगरच्या दोघा सराईतांना येवल्यात बेड्या; 3 गावठी पिस्टलसह 26 काडतुसे जप्त

नगरच्या दोघा सराईतांना येवल्यात बेड्या; 3 गावठी पिस्टलसह 26 काडतुसे जप्त

नाशिक । प्रतिनिधी

- Advertisement -

नगर जिल्ह्यातील दोघा सराईतांना नाशिक ग्रामिण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने येवल्यातून अटक केली आहे. या सराईतांकडून 3 गावठी पिस्टल, 26 जिवंत काडतुसे व 04 मॅगझिन असा घातक शस्त्रसाठा जप्त केला आहे.

दिनेश ज्ञानदेव आळकुटे, (30, रा. पाईपलाईन रोड, सावेडी, जि. अहमदनगर) व सागर मुरलीधर जाधव (21, रा. ब्राम्हणी, ता. राहुरी, जि. अहमदनगर) अशी सराईतांची नावे आहेत.

गुन्हे शाखेचेे पथक नाउघड गुन्हयांमधील सराईतांंचा शोध घेण्यासाठी येवला तालुका परिसरात गस्त घालत होते, दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील काही सराईत गुन्हेगार घातक शस्त्र बाळगुन धुळे बाजुकडून अहमदनगर बाजुकडे येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक के. के.पाटील यांना मिळाली.

त्यानुसार पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी येवला शहरातील विंचुर चौफुली परिसरात सापळा रचुन येवला शहराचे दिशेने येत असलेली एक सफेद रंगाची हयुंदाई क्रेटा कार अडवली. यावेळी सराईतांकडून अग्निशस्त्रे तसेच मोबाईल फोन, एमएच 16. बी. एच 8380 या क्रमांकाची ह्युंदाई क्रेटा कार असा एकूण 10 लाख 87 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दोघांविरुद्ध येवला शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह व अपर पोलीस अधीक्षक मालेगाव संदिप घुगे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के.के.पाटील, सपोनि स्वप्निल राजपूत, पोउनि संजयकुमार सोने, पोहवा रविंद्र वानखेडे, शांताराम घुगे, पोना रावसाहेब कांबळे, राजू सांगळे, हरिष आव्हाड, संदिप हांडगे, पो. कॉ. प्रविण काकड, भाउसाहेब टिळे, गिरीष बागुल, गणेश नरोटे, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, इम्रान पटेल, विशाल आव्हाड, संदिप लगड याच्या पथकाने केली.

आळकुटे हत्येतील संशयित

दिनेश आळकुटे याचेवर यापूर्वी नगर जिल्हयातील तोफखाना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असून संशयितांकडे चौकशी केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या