Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमNashik Fraud : एलआयसीला दोन कोटींचा गंडा

Nashik Fraud : एलआयसीला दोन कोटींचा गंडा

नाशकातील पीएनबी बँकेच्या हॉल इन्चार्जकडून धाडसी फसवणूक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पंतप्रधान जीवन ज्योती विम्यासह अन्य केंद्रीय योजनांचे तब्बल दोन कोटी रुपये पंजाब नॅशनल बँकेच्या एका हॉल इन्चार्ज अधिकाऱ्याने (Officer) बनावट विमाधारक उभे करुन लाटल्याचा खळबळजनक प्रकार शहरात घडला आहे. या अधिकाऱ्याने पदाचा व बँकेच्या लॉग इन आयडीचा गैरवापर करुन पत्नी व कुटुंबासह नातलगांच्या बँक खात्यात (Bank Account) या योजनांचे पैसे एनईएफटी करुन घेत एलआयसीला (LIC) व पीएनबीला हा गंडा घातला. यात तब्बल १०६ बनावट वारसदार तयार करत दाव्यांपोटी एलआयसीने वितरीत केलेले पैसे या अधिकाऱ्याने नातलगांच्या बँक खात्यांत वळते वैयक्तिक ‘मुदतठेव’ योजना राबविल्याचेही समोर आले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Maharashtra Winter Session 2024 : हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला

दीपक मोतीलाल कोळी (वय ४०, रा. भारद्वाज रेसिडेन्सी, भुजबळ फार्मजवळ, नवीन सिडको, नाशिक) असे संशयित हॉल इन्चार्ज अधिकाऱ्याचे नाव आहे. या फसवणूक (Fraud) प्रकरणी कॅनडा कॉर्नर येथील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखा प्रबंधक लतीका मधुकर कुंभारे यांनी सरकारवाडा पोलिसांत फिर्याद नोंदविली आहे. हा संपूर्ण प्रकार जुलै २०२२ ते २८ नोव्हेंबर २०२४ पर्यंत कॅनडा कॉर्नर येथील शाखेत घडला आहे. कुंभारे यांच्या फिर्यादीनुसार, कोळी हा बँकेत जुलै २०२२ पासून कार्यरत असून, काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने (Central Government) सर्वसामांन्यांसाठी प्रधानमंत्री जीवनज्योती विमा व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरु केली आहे.

हे देखील वाचा : Maharashtra Politics : CM पदाच्या चर्चेत ट्विस्ट; फडणवीसांच्या निकटवर्तीयाचे नाव आले समोर

या योजनेसाठी एलआयसी व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीची मास्टर पॉलिसी होल्डर म्हणून नेमणूक असताना विमाधारक खातेदार मृत पावल्यावर वारसदाराने विमा रकमेचा दावा करण्यासाठी बँकेचा फॉर्म व त्यासोबत सादर केलेले मृत्यू प्रमाणपत्र, ओळख पटविणारे कागदपत्रे, विमा हप्ता भरल्याचे पुरावे व वारसदाराचे बँक खात्याचा तपशिल व ओळखपत्र (Identification Card) अशी कागदपत्रे सादर केल्यावर ती बँकेकडून पडताळणी करून संबंधित एलआयसी किंवा ओरिएंटलच्या पोर्टलवर अपलोड केले जातात. त्याचवेळी बँक खातेदारांना सुविधा पुरविण्याचे कामावर देखरेख व समन्वय साधण्याचे काम दीपक कोळी पाहत होता.पंधरा लाख रुपयापर्यंतच्या कोणत्याही व्यवहारामध्ये निर्णय घेण्याचे अधिकार दीपकला होते. त्यामुळे दोन्ही विमा योजनांमध्ये प्रत्येक प्रकरणामधील दोन लाख रूपये रक्कम योजनेमधील सर्व लाभाथ्यर्थ्यांना पुरविण्याचे काम कोळी हेच पाहत होता. त्याला दिलेला लॉग इन व पासवर्ड कुणालाही माहीत नसताना, त्याने हा गंडा घातला.

हे देखील वाचा : World AIDS Day : नाशिक जिल्ह्याची एड्समुक्तीकडे वाटचाल

कोळी अडकला स्वतःच्या जाळ्यात

२७ नोव्हेंबर रोजी बँकेतील लिपीक प्रतिभा कुमारी यांच्याकडे दीपकने १९ खातेधारकांची यादी दिली. त्यात त्यांचे केवायसी कागदपत्रांमधील आधारकार्ड नंबर काढून टाकत त्याऐवजी मतदार ओळखपत्र क्रमांक नोंद करण्यास सांगितले. प्रतिभा यांना या बाबीचा संशय आल्याने त्यांनी व्यवस्थापक कुंभारे यांना सांगितले. एकूणच प्रकरणे संशयास्पद वाटल्याने कुंभारे यांनी या १९ खात्यांची माहिती घेतली असता त्यातील आठ खात्यावर जीवन ज्योती योजनेतून विमा धारकांच्या वारसदारांच्या खात्यावर येणारे प्रत्येकी दोन लाख रुपये जमा झाले होते आणि हेच पैसे दीपक कोळीने स्वतः सह पत्नी, आई, वडील, भाऊ व इतरांच्या बँक खात्यावर एनईएफटी, आरटीजीएसद्वारे वळविल्याचे दिसून आले.

खातेनिहाय चौकशी सुरुच

मुख्य प्रबंधक अजित साहू यांच्या आदेशाने कुंभारे यांनी विभागीय चौकशी करून अहवाल सादर केला. त्यात आतापर्यंत १०६ बनावट वारसदारांच्या बँक खात्यावर एकूण २ कोटी १२ लाख रुपये वळते केले आहेत. तर, आता बनावट वारसदार तसेच अपहार झालेल्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे. शिवाय ज्या विमाधारक खातेधारकांचा मृत्यू दाखवून ही रक्कम ज्या संशयित वारसदारांच्या खात्यावर गेली व असे विमाधारक खातेदार मृत झाले आहेत की कसे मृत पावले आहेत, याची चौकशी आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...