Wednesday, October 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Crime News : प्रवासी भरण्याच्या वादातून तरुणावर पेव्हर ब्लॉकने हल्ला; दोघे...

Nashik Crime News : प्रवासी भरण्याच्या वादातून तरुणावर पेव्हर ब्लॉकने हल्ला; दोघे ताब्यात

त्र्यंबकनाका सिग्नलवरील घटना; जखमी जिल्हा रुग्णालयात दाखल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

त्र्यंबक नाका सिग्नल (Trimbak Naka Signal) परिसरात रिक्षात प्रवासी भरण्याच्या वादातून प्रेम हिरे या तरुणाच्या डोक्यात दगड आणि पेव्हर ब्लॉकने वार करण्यात आल्याची घटना सोमवारी (दि. १२) सायंकाळी घडली. या हल्ल्यात प्रेम गंभीर जखमी झाला. गुंडाविरोधी पथकाने तातडीने हस्तक्षेप करत दोघा संशयितांना ताब्यात घेतले.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम हिरे आणि त्याच्या मित्रांचा पवन पाटील व अरुण कांबळे यांच्याशी प्रवासी भरण्यावरून वाद झाला होता. त्यातून झालेल्या मारहाणीत (Beating) प्रेमच्या डोक्यावर वार करण्यात आला. या प्रकरणात पवन गोविंदा पाटील (२५) आणि राहुल लहू सोनवणे (२५) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. जगदीश गायकवाड आणि अरुण कांबळे यांचाही सहभाग असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

गुंडाविरोधी पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील आडके आणि पोलीस अंमलदार गुरु गांगुर्डे यांनी मारहाण सुरू असल्याचे पाहून हस्तक्षेप केला. वाहतूक पोलिसांच्या मदतीने दोघांना ताब्यात घेण्यात आले. जखमी प्रेमला जिल्हा शासकीय रुग्णालयात (Civil Hospital) दाखल करण्यात आले. दीपक संजय पाटील यांच्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

SIR

मतदारयादीतील तपशील आजच तपासा अन्…! मुख्यमंत्र्यांकडून SIR बाबतचे गैरसमज दूर करण्याचा...

0
मुंबई | Mumbaiमुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून दिल्लीतील आंदोलनाला राजकीय वळण मिळत असल्याचे चित्र आहे. विरोधी पक्षांसह कॉकरोच जनता पार्टी (CJP)...