Friday, October 30, 2026
Homeक्राईमNashik Crime News : एसटी बसमध्ये धाडसी चोरी; गर्दीचा फायदा घेणाऱ्या अट्टल...

Nashik Crime News : एसटी बसमध्ये धाडसी चोरी; गर्दीचा फायदा घेणाऱ्या अट्टल महिला चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या

लाखाचे मंगळसूत्र हस्तगत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

लासलगाव ते निमाणी मार्गावर (Lasalgaon and Nimani Highway) धावणाऱ्या एसटी बसमध्ये प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील सराईत महिला चोरट्यांच्या टोळीचा भांडाफोड झाला आहे. प्रवासादरम्यान एका ५५ वर्षीय महिला प्रवाशाचे गळ्यातील एक लाखांचे मंगळसूत्र लांबवल्याची घटना घडली. मात्र, पीडित महिलेच्या समयसूचकतेमुळे चालकाने एसटी बस आडगाव पोलीस ठाण्यात नेल्याने चारही महिला पोलिसांच्या (Woman) जाळ्यात अडकल्या आहेत. 

- Advertisement -

निफाड तालुक्यातील शिवरे येथील रहिवासी नंदा शिवाजी वाघ (वय ५५) या लासलगाव ते नाशिक (Nashik) या एसटी बसने प्रवास करत होत्या. (दि. ५) दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास बस नांदूर नाका परिसरात आली असता, चार संशयित महिलांनी संगनमत करून नंदा वाघ यांच्याभोवती गर्दी निर्माण केली. या गर्दीचा फायदा घेत त्यांनी वाघ यांच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हातचालाखीने लांबवले. ​नांदूर नाक्याजवळ संशयित महिला बसमधून उतरण्याच्या तयारीत असतानाच नंदा वाघ यांना गळ्यातील दागिना गायब असल्याचे लक्षात आले. त्यांनी आरडाओरड करत संशयित महिलांकडे बोट दाखवले.

गांभीर्य ओळखून एसटी बस चालकाने गाडी आडगाव पोलीस ठाण्यात (Aadgaon Police Station) नेली. आडगाव पोलिसांनी बसमधील संशयित महिलांची कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. पोलिसांनी कौशल्याने तपास करत एक लाख रुपयांचे मंगळसूत्र हस्तगत केले. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांच्या सूचनेने हवालदार वाघ तपास करत आहेत.

​वृद्ध व महिलांना हेरून डझनभर चोऱ्या

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील एका विशिष्ट वर्गातील या महिला सराईत गुन्हेगार आहेत. बसमध्ये स्वत:हून गर्दी निर्माण करायची आणि ४५ ते ८० वयोगटातील वृद्ध, महिला व पुरुषांना लक्ष्य करून दागिने लांबवायचे, अशी यांची माेडस आहे. या महिलांनी आतापर्यंत अशा प्रकारचे डझनभर गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. चारही महिलांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून, त्यांच्याकडून नाशिक व आसपासच्या परिसरातील चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

अटकेतील महिलांची नावे

​अलवेली व्यंकटेश बूडबुडकोलम (वय ४०)
​लावणी चंदप्पा साकरे (वय २२)
​दीपिका राहुल चटई (वय ३२)
​नंदिनी नरेश बिस्तर (वय २५)
(सर्व रा. पाण्याच्या टाकीजवळ, झोपडपट्टी, छत्रपती संभाजीनगर)

ताज्या बातम्या

सिंहस्थ महाकुंभमेळा २०२७ : पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते रामतीर्थ येथे गंगापूजन...

0
नाशिक, दि. ३० (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या शुभारंभानिमित्त शनिवार ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री...