नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सातपूर (Satpur) येथील एका कंपनीत (Company) काम करतांना मशिनमध्ये डोके अडकून एका २१ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुमीत रामदास सपकाळे (वय २१, रा. पाडळसा, ता. यावल, जि. जळगाव, सध्या रा. केएसडब्ल्यू कॉलेजसमोर, उत्तमनगर, सिडकाे) असे मृताचे नाव आहे.
सातपूर पाेलिसांच्या (Satpur Police) माहितीनुसार, मृत सुमीत हा आज साेमवारी(दि. २६) सकाळी आठ वाजेच्या सुमारास कंपनीत कामावर गेला होता. कंपनीतील मशीन प्लांट नंबर-२ येथे तो काम करत असताना, सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अचानक त्याचे डोके मशिनमध्ये अडकले.
या अपघातात (Accident) तो गंभीर जखमी झाला व रक्तस्त्राव झाल्याने त्याची प्रकृती खालावली. घटना घडल्यानंतर कंपनीचे प्रसाद शुक्ल यांनी सुमीतला उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात (Nashik Civil Hospital) दाखल केले. मात्र, त्याला डॉ. पाटील यांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे कामगार वर्गात आणि परिसरात शोककळा पसरली आहे.




