Monday, September 7, 2026
Homeक्राईमNashik Crime News: जुन्या भांडणाची कुरापत काढून युवकाचा धारदार शस्त्राने खून; दिंडोरीतील...

Nashik Crime News: जुन्या भांडणाची कुरापत काढून युवकाचा धारदार शस्त्राने खून; दिंडोरीतील चौसाळे येथील घटना

वणी | वार्ताहार
जुन्या भांडणाची कुरापत काढून धारदार शस्त्राने वार करत एका तरुणाचा मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घडलेल्या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना (दि. २२) ऑक्टोबर रोजी रात्री साडे दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान परिसरात घडली आहे.

मृत तरुणाचे नाव राहुल किशोर काळे (वय १८, रा. एकलहरे) असून, विजय पवार (वय १७) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. (दि.२२) ऑक्टोबर रोजी रात्री चौसाळे गावात तमाशाचा कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रमाच्या गर्दीत काही युवकांनी जुन्या वादाची कुरापत काढत वाद सुरू केला. हे भांडण सोडविण्यासाठी विजय पवार पुढे आला असता मला का मारले असा जाब विचारल्याने त्यांच्यात वादावादी झाली. वादाचे रुपांतर हाणामारीत करत धारदार शस्त्राने वार करण्यात आले. त्याच गटातील राहुल काळे याच्यावरही तीक्ष्ण हत्याराने छाती व पाठीवर वार करण्यात आले. त्यात प्रचंड रक्तस्राव झाल्याने राहुलचा मृत्यू झाला.

- Advertisement -

घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृत राहुल व जखमींना रुग्णालयात हलवले. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत सहा संशयितांना ताब्यात घेतले. त्यात मोहन लहु पवार,रा. एकलहरे, ता. दिंडोरी, दीपक धनराज गायकवाड, रा. करंजखेड, ता. दिंडोरी , गणेश बाळू गायकवाड,रा. एकलहरे, ता. दिंडोरी, निवृत्ती पोपट चौधरी ,रा.करंजखेड, ता. दिंडोरी आणि दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

दरम्यान, या प्रकरणी केवळ विष्णु पागे ( वय २९ ), रा. एकलहरे, ता. दिंडोरी फिर्यादीवरून वणी पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सपोनी गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे करीत आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पाटील आक्रमक; १२ तारखेला अंतरवालीत निर्णायक बैठक,...

0
जालना । Jalna मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाने पुन्हा एकदा निर्णायक टप्पा गाठला असून, आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर वेळकाढूपणाचा आरोप करत...