Thursday, April 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Crime : तीन वर्षीय बालिकेचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळला; एकास अटक

Nashik Crime : तीन वर्षीय बालिकेचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळला; एकास अटक

मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon

तालुक्यातील डोंगराळे येथे रविवारी (दि.१६) सायंकाळपासून बेपत्ता असलेल्या तीन वर्षीय बालिकेचा (Girl) मृतदेह (Dead Body) गावालगत संशयास्पद परिस्थितीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात (Malegaon Taluka Police Station) मारेकऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विजय संजय खैरनार (२४) या संशयिताला अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

सदर बालिका सायंकाळी तीन तासांपासून बेपत्ता असल्याने कुटुंबियांसह (Family) ग्रामस्थ तिचा शोध घेत होते. याप्रकरणी पोलिसांना देखील कळविण्यात आले होते. संध्याकाळच्या वेळी जिल्हा परिषद शाळेकडे असणाऱ्या मोबाईल टॉवरच्या परिसरात तिचा मृतदेह संशयस्पदरित्या आढळला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबियांनी आक्रोश केला. घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलिसांसह अपर पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह संधू, सहायक पोलीस उपअधीक्षक पथकासह घटनास्थळी दाखल झाले. या बालिकेवर लैगिंक अत्याचार झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात असल्यामुळे घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

दरम्यान, बालिकेच्या मारेकऱ्याला अटक (Attack) झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय कुटुंबियांसह ग्रामस्थांनी घेतल्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंन्त मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन विजय खैरनार या संशयितास अटक (Arrested) करण्यात आली आहे. तसेच संशयित आरोपीवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी आज ग्रामस्थांतर्फे मालेगाव कुसुंबा राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : घरभेदी भाडेकरू गजाआड; शिवाजीनगरमधील मुख्याध्यापकाच्या घरफोडीचा युनिट...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik ज्या भाडेकरूवर विश्वास ठेवून घरमालकाने त्याला आपल्या वास्तूत आसरा दिला, त्याच भाडेकरूने मालकाचा विश्वासघात केल्याचा प्रकार शिवाजीनगर भागातून (Shivajinagar Area)...