Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमNashik Crime : महाठगाचे बिंग फुटले; राज्यपाल बनवण्यासाठी शास्त्रज्ञाकडून उकळले सहा कोटी

Nashik Crime : महाठगाचे बिंग फुटले; राज्यपाल बनवण्यासाठी शास्त्रज्ञाकडून उकळले सहा कोटी

कथित कार्यकर्ता नागरपुरातून ताब्यात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्यपालपद (Governor Post) मिळवून देण्याचे आमिष दाखवित तामिळनाडूतल्या एका विभूषित शाखज्ञाला सहा कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या नाशिकच्या (Nashik) महाठगास नाशिक शहर पोलिसांनी (Nashik City Police) अटक केली आहे. निरंजन सुरेश कुलकर्णी (वय ४०, रा. सेवन श्री अपार्टमेंट, गंधर्व नगरी, नाशिकरोड) असे संशयित ठगचाजाचे नाव आहे. नाशिक मध्यवर्ती गुन्हे शाखेने त्याला नागपुरातून बेड्या ठोकल्या. राज्यपालपद देण्यासाठी त्याने तब्बल पंधरा कोटी रुपयांचे ‘सेवाशुल्क’ मागितल्याचेही समोर आले असून तो आरएसएसचा (RSS) माजी स्वंयसेवक आणि धर्म जागरण विभागाचा कार्यकर्ता होता, असे पोलीस तपासात उघड झाले आहे.

- Advertisement -

तामिळनाडू राज्यातील (Tamilnadu State) चेत्रईतील थिस्वन्मीदूरमध्ये राहणारे व्यावसायिक व शास्त्रज्ञ नरसिम्मा रेड्डी दामोदर रेड्डी अपुरी (वय ५६) यांनी मुंबई नाका पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार नाशिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या पथकाने निरंजन कुलकर्णी याला अटक केली. रेड्डी यांनी ७ फेब्रुवारी ते २ एप्रिल २०२४ या कालावधीत संशयिताला ५ कोटी ८ लाख ९९ हजार ८७६ रुपये दिले आहेत. त्यापैकी साठ लाख रुपये रोख रकम असून, उर्वरित पैसे स्वतःसह नातलगांच्या बँक खात्यातून रेड्डींनी संशयिताच्या बँकेत जमा केले. संशयिताचा डाव लक्षात आल्यावर रेड्डींनी पैसे परत मागितले. त्यावेळी पैसे देण्यास नकार देत फोनवरून संशयिताने रेड्डींना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

दरम्यान, राजकीय बलय असलेल्या या गुन्ह्याच्या नोंदीनंतर शहर पोलिसांवर मुंबई व नागपुरातून राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचे कळते. मात्र, पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळून संशयिताला अटक करून रविवारी (दि. ८) न्यायालयासमोर (Court) हजर केले. त्यानंतर डिटेल खुलासा केला. शाखज्ञ रेड्डी हे एका आमेष्टाकडे पूजाविधीसाठी गेले असताना संशयितासोबत त्यांची ओळख झाली. राजकीय ओळखींचा दावा करु संशयिताने रेड्डीना आमिष दाखविले. कुलकर्णीच्या दाव्यांवर विश्वास त्यांनी ठेवला. १२ जानेवारी २०२४ रोजी मुंबई नाका पोलिस ठाण्याजवळील (Mumbai Naka Police Station) कोर्ट यार्ड हॉटेलात दोघांची भेट झाली.

त्यावेळी त्याने कुठल्याही छोट्या मोठ्या राज्याचे गव्हर्नर पद मिळवून देऊ शकतो. त्यासाठी पंधरा कोटी रुपयांचा सर्व्हिस चार्ज लागेल’, असे कुलकर्णी म्हणाला होता. व्यवहार ठरल्यानंतर ७ फेब्रुवारी रोजी दोघे पुन्हा त्याच हाँटेलात भेटले. ‘जर काम नाही केले तर माझ्या नावावरील जमिनीचे (Land) खरेदी खत तुमच्या नावे करेल’, असा दावा कुलकर्णीने केला, तसेच पेंच व बोर व्याघ्र प्रकल्पांजवळील शंभर एकर जागा लीजबर घेतल्याबाचत बनावट कागदपत्रे कुलकर्णीने रेड्डींना दाखवली. त्यावर भारत सरकारची बनावट मोहर होती. यासह त्याने नाशिकच्या (Nashik) चांदशी येथील एका जमिनीचे बनावट दस्तऐवज दाखवून रेड्डीचा विश्वास संपादित केला, असे उघड झाले आहे.

स्वयंसेवक ते ठगबाज

संशयित कुलकर्णी हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्म जागरण विभागाचा कार्यकर्ता होता. त्यातून राजकीय वर्चस्व निर्माण केल्याचा दावा त्याने नागरिकांमध्ये केला. काही महिन्यांपासून तो सक्रीय नसल्याचे समजते. त्याचे वडील महावितरण विभागातून दहा वर्षांपूर्वी निवृत्त झाले आहेत. संशयिताचे राजकीय पक्षाच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांसमवेत बरेच फोटो आहेत. ‘हायप्रोफाइल लाइफस्टाइल’ जगण्याची त्याला हौस असून त्याच्या कारवर ‘खासदार’ असा शासक्रिय लोगों होता. कौटुंबिक कलहामुळे त्याची पत्नी विभक्त राहत असल्याचे कळते. सतत राजकीय वर्तुळात वावरताना त्याने अनेकांना फसविल्याची माहिती पोलिसांकडे आहे.

ठळक मुद्दे

संशयित कुलकर्णीचे बारावीपर्यंत शिक्षण
संशयिताने कोट्यवधी रुपये कुठे दडवले?, याचा तपास सुरु
हॉटेलिंग, मौजमस्तीत पैसे खर्च केल्याचे समोर
संशयितांच्या वडिलांच्या नावे मुदत ठेवीच्या नोंदी
नागपुरातील हॉटेलातून पोलिसांनी ठोकल्या बेड्या
१७ डिसेंबरपर्यंत नाशिक पोलिसांच्या कोठडीत

संशयित काही दिवसांपासून नागपूर येथे फिरत होता. पोलिसांना गुंगारा देत नागपुरात एका मित्राकडेव हॉटेलात लपला. पथकाने त्याला ताब्यात घेतले. गुन्ह्याची व्याप्ती व फसवणुकीचे प्रकार वाढण्याची शक्यता आहे. दाखल तक्रारीनुसार पथक खाना करून त्याला गजाआड केले आहे. सखोल तपास सुरु आहे.

संदीप मिटके, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...