Tuesday, February 3, 2026
Homeक्राईमNashik Crime : घरफोड्या करणाऱ्या दोघांना अटक; आठ लाखाचा ऐवज हस्तगत

Nashik Crime : घरफोड्या करणाऱ्या दोघांना अटक; आठ लाखाचा ऐवज हस्तगत

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

शहरात विविध ठिकाणी घरफोड्या करून सोन्याचे दागिने (Gold) चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना नाशिकरोड गुन्हे शाखा युनिटच्या वतीने अटक (Arrested) केली असून त्यांच्याकडून ८ लाख ५० हजार किमतीचे ७० ग्राम वजनाचा सोन्याचा लगड जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस हवालदार नितीन फुलमाळी, दत्तात्रय चकोर यांना माहिती मिळाली की दोन संशयित जेलरोड येथील सैलानी चौकात सोन्याची लगड विकण्यासाठी येणार आहेत. यानंतर युनिटचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार, प्रेमचंद गांगुर्डे, दिलीप भोई,मंगला जगताप,अविनाश देवरे, मंगेश जगझप, संजय पोटिंदे, भारत राऊत आदींच्या पथकाने सैलानी चौकातील मनपाच्या उद्यानात सापळा रचला.

YouTube video player

त्यानंतर संशयित हर्षल उत्तम शिंदे (वय २१) आणि यासीन अनिस शेख (वय २२) दोन्ही रा. महादेव वाडी, सातपूर यांना ताब्यात घेतले. तसेच त्यांनी चोरी केलेला ऐवज पोलिसांनी (Police) जप्त केला. यानंतर त्यांनी नाशिक शहरात तीन ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली.

ताज्या बातम्या

Ravindra Pagar Passed Away : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पगार...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र नाना पगार (Ravindra Pagar) यांचे अल्पशा आजाराने (आज दि.३) निधन झाले. त्यांचा अंत्यविधी बुधवार दि....