Thursday, September 19, 2024
HomeनाशिकNashik Crime News : गोळीबार प्रकरण चिघळले; संशयितांच्या दाव्यानंतर बडगुजरपुत्रास पोलिसांची नोटीस

Nashik Crime News : गोळीबार प्रकरण चिघळले; संशयितांच्या दाव्यानंतर बडगुजरपुत्रास पोलिसांची नोटीस

शोध सुरु

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

सिडकोत (Cidco) दोन वर्षांपूर्वी माहिती अधिकार कार्यकर्ता प्रशांत जाधव (Prashant Jadhav) यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील संशयितांच्या पोलीस चौकशीत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांचा मुलगा दीपक याचा सहभाग असल्याचे समोर येते आहे. संशयित दीपकच्या शोधासाठी शहर पोलिसांनी पथके रवाना केली असून, पोलीस चौकशीत दीपकमार्फत गोळीबाराची ‘सुपारी’ दिल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे गोळीबार प्रकरण चिघळत असून बडगुजर परिवाराच्या मागे पुन्हा पोलिसांच्या चौकशीचा समेमिरा लागला आहे. तर, या प्रकरणात दीपक बडगुजर यांनी सहकार्य न केल्यास त्यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : साठ लाखांच्या खंडणीची मागणी; कंपनी चालकाची न्यायालयात तक्रार

आरटीआय कार्यकर्ते अॅड. प्रशांत जाधव यांच्यावर १४ फेब्रुवारी २०२२ रोजी सिडकोतील उपेंद्रनगर येथे रात्री गोळीबार (Firing) झाला. या हल्ल्यात जाधव जखमी झाल्याने अज्ञातांविरुद्ध अंबड पोलिसांत (Ambad Police) खुनाच्या (Murder) प्रयत्नाचा गुन्हा नोंदविण्यात आला. तेव्हापासून फरार असलेल्या संशयितांना सप्टेंबर २०२४ मध्ये शोधण्यात नाशिक पोलिसांना (Nashik Police) यश आले. गुंडद्याविरोधी पथकाने तिघांना अटक केली असता, मयूर बेदच्या सांगण्यावरून गोळीबार केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.

हे देखील वाचा : Nitin Gadkari : “मला विरोधकांनी पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती”; नितीन गडकरींचा मोठा गौप्यस्फोट

त्यानंतर दीपक बडगुजरांशी विशेष जवळीक असलेल्या अंकुश लक्ष्मण शेवाळे (वय ३३, रा. धनलक्ष्मी चौक, सिडको) व प्रसाद संजय शिंदे (वय २९, रा. नांदूरगाव) या संशयितांना अटक (Arrested) झाली. अंकुशने प्रसाद मार्फत मयूर बेद याला सुमारे दोन लाख रूपये दिल्याचे समोर आले. त्यानुसार पुणे येथील चाकण परिसरातून शुक्रवारी (दि.१३) मयूर बेदला अटक करण्यात आली होती. दरम्यान, मयूर बेद व अंकुश शेवाळे यांची शनिवारी (दि.१४) रात्री उशिरापर्यंत समोरासमोर पोलिसांनी केलेल्या चौकशीत दीपक बडगुजरचे नाव समोर आले. अंकुशने दीपकच्या मध्यस्तीतून मयूरकडे हत्येची ‘सुपारी’ दिल्याचे समजते आहे.

हे देखील वाचा : उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा तीन मजली इमारत कोसळली; नऊ जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले

कारणे दाखवा नोटीस

संशयित अंकुश शेवाळे यास रविवारी (दि.१५) न्यायालयात हजर केले असता, त्याने पोलीस मारहण करत असल्याचा दावा केला. त्यामुळे न्यायालयाने अंबड पोलिसांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून न्यायालयाने शेवाळेचा ताबा वैद्यकीय चाचणी होईपर्यंत गंगापूर पोलिसांकडे सोपविला होता. चाचणी पूर्ण झाल्यावर त्याचा ताबा पुन्हा अंबड पोलिसांकडे देण्यात आला. दरम्यान, मारहाणीसंबंधीचा वैद्यकीय अहवाल जिल्हा रुग्णालय न्यायालयात सादर करणार असल्याचे समजते. या नाट्यमय घडामोडींनंतर न्यायालयाने (Court) शेवाळे याच्या पोलीस कोठडीत पुन्हा सात दिवसांची वाढ केली आहे.

बडगुजर चक्रव्युहात

सन २०२३ मध्ये दहशतवादी सलीम कुत्ता याच्यासोबत डान्स केल्याप्रकरणी सुधाकर बडगुजर यांच्याविरुद्ध कारवाई झाली. गुन्हे शाखेच्या चौकशीअंती आडगाव पोलिसांत गुन्हा नोंद झाला. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही बडगुजर यांच्याविरुद्ध महापालिकेच्या तत्कालीन अर्ज चौकशीअंती सरकारवाडा पोलिसांत गुन्हा नोंदविला. लोकसभा निवडणुकीत बडगुजर यांना तडीपारीची नोटीस बजावून रद्द करण्यात आली. आता त्यांचा मुलगा दीपक याचा गोळीबारात सहभाग समोर येत आहे.

आतापर्यंतचा तपास

  • दीपक व अंकुश हे दोघे जीवलग मित्र
  • अंकुश शेवाळेला अटक होताच मंगळवारपासून (दि. १०) दीपक पसार.
  • कट रचून गोळीबार केल्याचे तपासात उघड
  • अॅड. प्रशांत जाधव आणि अंकुश शेवाळेसह इतर संशयितांमध्ये बाद होते,
  • धमकावणे आणि तद्रसबंधी वादातून गोळीबार

प्राणघातक हल्ला व आर्म अॅक्टच्या गुन्ह्यातील संशयितांना अूटक केल्यावर सर्व नावे पुढे येत आहेत.
त्यानुसार या गुन्ह्यात संशयितांच्या नावाचा व तपासाचा समावेश करीत आहोत. चौकशीत जे निष्पन्न होईल, त्यानुसार कार्यवाही होईल.

मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त, झोन-२

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या