Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमNashik Crime : सिने स्टाईलने पाठलाग करून पोलिसांनी केला २८ किलो गांजा...

Nashik Crime : सिने स्टाईलने पाठलाग करून पोलिसांनी केला २८ किलो गांजा जप्त

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

फिल्मी स्टाईलने पाठलाग करून गांजा (Ganja) तस्करांना पकडण्यास आडगाव गुन्हे शोध पथकास (Squad) यश मिळाले आहे. यात एका संशयितास जेरबंद करण्यास यश मिळाले असून त्यांचेकडून अठ्ठावीस किलो गांजा हस्तगत करण्यात आला आहे. यातील चार संशयित फरार असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात (Adgaon Police Station) तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

- Advertisement -

नाशिक शहरात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांच्या आदेशान्वये स्टॉप अँड सर्च मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आडगाव पोलीस ठाणे हद्दीत मंगळवार (दि. ७ ) रोजी पहाटे हवालदार भाऊराव गांगुर्डे व अमलदार बाळकृष्ण पवार स्टॉप अॅण्ड सर्च कारवाई करत होते. या दरम्यान आडगाव सीआर मोबाईल मुंबई-आग्रा महामार्गावर गस्त घालीत होती. यावेळी ट्रक टर्मिनसजवळ लालरंगाची मारुती एसएक्सफोर क्रमांक (एमएच ०२ जेपी ०१२३) चारचाकी चालकाने न थांबवता पोलिसांच्या अंगावर गाडी घालून पळ काढला.

सिने स्टाईलने पाठलाग करून पोलिसांनी केला २८ किलो गांजा जप्त | Nashik | Nashik Police

याबाबत आडगाव पोलीस हवालदार भाऊराव गांगुर्डे यांनी पोलीस (Police) कंट्रोल रूमला संशयितरित्या पळ काढलेल्या लाल रंगाची चारचाकी वाहनाचा पाठलाग करीत असल्याची माहिती कळविली. त्यानुसार पंचवटी, भद्रकाली, मुंबई नाका पोलीस यांनी देखील या वाह्माचा माग काढत होत्या. तब्बल दोन ते तीन तासांच्या पाठलागानंतर सदर गाडी ही छत्रपती संभाजी महाराज नगररोडवर काम सुरू असल्याने संशयितांनी गाडी सोडून पळ काढला. यावेळी आकाश गणेश डोळस (वय ३६), रा. डी २०४ रॉयल एलजीएम सेक्टर टू फ्लॅट नंबर ४७, करंजाडे, तालुका पनवेल जिल्हा रायगड,) यास ताब्यात घेतले आहे.

या संशयिताकडून सुमारे २८ किलो ४५४ ग्रॅम गांजा व चारचाकी वाहन (Four Wheeler) असा एकूण पंधरा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. संशयित राजू धोत्रे, प्रशांत सोनकांबळे, गोंद्या पूर्ण नाव माहिती नाही व संतोष (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) चार संशयित अंधाराचा फायदा घेत फरार झाले. या प्रकरणी पाच संशयिताविरूद्ध आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

यांनी बजावली कामगिरी

सदर कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पंचवटी विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त पद्मजा बढे यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार, गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, पोलीस उपनिरीक्षक सुनील भुसाळ, सहायक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र शिंदे, पोलीस हवालदार भाऊराव गांगुर्डे, शिवाजी आव्हाड, मनोज परदेशी, गणेश देसले, पोलीस अंमलदार बाळकृष्ण पवार, सचिन बहिकर, यांनी बजाविली आहे.

पाच हजारांचे बक्षीस

नियंत्रण कक्षात कर्तव्यास असणाऱ्या महिला पोलीस अमंलदार सुगंधा नवले यांनी तत्काळ इतर वाहनांना कॉल करून मदतीस पाठवले. पोलिसांच्या आठ गाड्यांनी तब्बल २५ किलोमीटर सतत २ ते ३ तास पाठलाग केल्यानंतर वाहन व चालकास ताब्यात घेतले. या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पथकातील सर्वांना ५ हजारांचे बक्षीस दिले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...