Wednesday, September 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजIndia Alliance Meeting : मोठी बातमी! निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीचा एल्गार; काढणार...

India Alliance Meeting : मोठी बातमी! निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीचा एल्गार; काढणार भव्य मोर्चा, खर्गेंनी केली घोषणा

नवी दिल्ली | New Delhi

‘विशेष सखोल पुनरावलोकन’ (SIR) प्रक्रियेचा मुद्दा आणि मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कारवाईची मागणीच्या पार्श्वभूमीवर आज (बुधवार) विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ (INDIA) आघाडीची नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बनर्जी, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुला, खासदार सुप्रिया सुळे,बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, यांच्यासह समाजवादी पक्षाचे खासदार हरेंद्र मलिक आणि मौलाना मोहिबुल्ला नदवी आदी उपस्थित होते.

- Advertisement -

आजच्या इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी इंडिया आघाडीतर्फे निवडणूक आयोगाविरोधात येत्या २ ते ८ ऑक्टोबर दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयांबाहेर जिल्हास्तरीय ‘लोकशाही वाचवा मोर्चे’ आणि निदर्शने केली जातील. तर ६ ऑक्टोबरला सर्व विरोधी पक्षांचे खासदार निवडणूक आयोगापर्यंत ‘लोकशाही वाचवा’ मोर्चा काढतील अशी मोठी घोषणा केली. तसेच ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा न दिल्यास आम्ही देशभरात आंदोलन करणार, असेही खर्गे म्हणाले. तसेच ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात विरोधी पक्षांचे नेते देशाच्या राष्ट्रपतींची भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. याशिवाय विरोधी पक्षांच्या पाच प्रमुख सभा देखील आयोजित केल्या जातील, असेही खर्गे म्हणाले.

मोदी आणि शाह निवडणूक आयोगाला कळसूत्री बाहुल्यांसारखे वापरतात

यावेळी खर्गे म्हणाले की, “आजच्या बैठकी तीन तास चालली आणि या बैठकीत तब्बल २० पक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत निवडणूक आयोगाबाबत पुढील रणनीती ठरविण्यात आली. मोदी आणि शाह निवडणूक आयोगाला कळसूत्री बाहुल्यांसारखे वापरत असून,ते मतांची चोरी करत आहेत. त्यांनी मतांची चोरी करून निवडणुका जिंकल्या आहेत. ज्याठिकाणी विरोधी पक्षाचे नेते न्यायासाठी, लोकशाहीसाठी आणि तरुणांसाठी लढत आहेत त्याठिकाणी त्यांचा छळ केला जात आहे, असे त्यांनी म्हटले.

ममता बॅनर्जीं काय म्हणाल्या?

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली. भाजपने वोट चोरी करुन निवडणुका जिंकल्या असून, ज्ञानेश कुमार चोर असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे कुमार यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे,असे बॅनर्जीं यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

Sachin Vaze : मोठी बातमी! माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेला धक्का;...

0
मुंबई | Mumbai उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर गाडीत स्फोटके ठेवल्याप्रकरणी एनआयच्या कोठडीत असलेल्या माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना मुंबईतील...