Tuesday, July 14, 2026
Homeक्राईमNashik Ravindra Erande Crime : एरंडेचा खरातप्रमाणेच अघोरी प्रथा, जादूटोणा; कार्यालयातून पक्ष्यांचे अवयव,...

Nashik Ravindra Erande Crime : एरंडेचा खरातप्रमाणेच अघोरी प्रथा, जादूटोणा; कार्यालयातून पक्ष्यांचे अवयव, सापाची कात, कवडी जप्त

पीडितांकडून खंडणी उकळल्याचा संशय

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील उच्चभ्रू वर्तुळात वावरणाऱ्या पत्रकार रवींद्र एरंडे याने केवळ लैंगिक शोषणच नव्हे, तर अशोक खरातप्रमाणेच (Ashok Kharat) अघोरी प्रथा, जादूटोणा आणि वशीकरणाच्या बळावर महिलांना जाळ्यात ओढण्याचा संशय आता बळावला आहे. पोलिसांनी (Police) त्याच्या कार्यालयातून जप्त केलेली सापाची कात, पक्ष्यांचे अवयव, कवडी हे साधे साहित्य नसून, त्यामागे एक मोठे ब्लॅकमेलिंग रॅकेट असल्याचे तपासात समोर येत आहे. अत्याचारासह अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या एरंडेच्या पोलीस कोठडीत नाशिक न्यायालयाने चार दिवसांची वाढ केली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Ravindra Erande Crime : ‘सन्मानयुग’ च्या नावे ‘कलंकयुग’; एरंडेच्या ‘त्या’ क्लिप्समध्ये अनेक संसार पणाला

काही काळापूर्वी शहर पोलिसांच्याच (City Police) हस्ते सत्कार घेणारा हा प्रतिष्ठित चेहरा आज कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. पोलीस कोठडीत वाढ झाल्यानंतर आता तपासाची दिशा एरंडेच्या अघोरी कनेक्शनकडे वळली आहे. ऑफिसबॉयने केलेल्या भांडाफोडीनंतर आता एकापाठोपाठ एक ७ पीडित महिलांनी हिंमत दाखवत थेट फिर्याद देणे आवश्यक ठरणार आहे. आक्षेपार्ह व्हिडिओवरून चौघांनी खंडणी उकळल्याचे सांगत स्वतःचे पाप लपविणाऱ्या पत्रकार एरंडे याच्या लैंगिक अत्याचाराचे बिंग अखेरीस त्याच्याच ‘ऑफिस बॉय’ने रचलेल्या सापळ्यामुळे फुटले.या प्रकरणात चार एप्रिलपासून पोलीस कोठडीत असलेल्या एरंडेच्या तपासादरम्यान धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत.

हे देखील वाचा : Nashik Crime News : सातपूरला ‘खरात फाईल्स’ची पुनरावृत्ती! लैंगिक शोषण प्रकरणी रवींद्र एरंडेला बेड्या

दोन दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) संपल्याने त्याला सोमवारी (दि. ६) पुन्हा नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांनी न्यायालयात तपासाचे मुद्दे स्पष्ट केले. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता भानुप्रिया पेठकर यांनी सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद केला. त्यानुसार न्यायालयाने एरंडे याच्या पोलिस कोठडीत १० एप्रिलपर्यंत वाढ केली. दरम्यान, ऑफिस बॉयने मालकाच्या गैरकृत्यांचा भांडाफोड करून बारा लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता. व्यावसायिकाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चार खंडणीखोरांना अटक केली होती. तर जप्त केलेल्या ङ्गडीव्हीडीफमध्ये व्यावसायिकाचेच १२१ आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ सापडले. त्यामुळे पीडितेच्या फिर्यादीवरून व्यावसायिक एरंडेविरुद्ध गुन्हा नोंद असून, आणखी सात पीडिता पोलिसांसमोर आल्याने एरंडे गोत्यात सापडला आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : खरातच्या घरात पोतेभर पैसा; मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमधून हवाला रॅकेट!

यासाठी पुन्हा कोठडी

  • संशयास्पद आर्थिक व्यवहारांची तपासणी करणे
  • संशयिताने महिलांना अश्लील व्हिडिओंची भीती दाखवून खंडणी वसूल केल्याचा संशय
  • सापाची कात, पक्ष्यांचे अवयव, कवडी याचा वापर कशासाठी याचा तपास करणे
  • पीडितांचे अश्लील व्हिडिओ कोठे साठवले, त्याचा वापर कोठे केला याबाबत तपास
  • संशयिताकडून पोलीस कोठडीत वेळकाढूपणा; कसून चौकशी सुरू

हे देखील वाचा : Anjali Damania : DCM शिंदेंच्या पीएचे खरातसोबत कॉल, समता पतसंस्थेतही अनेक व्यवहार; सीडीआर कुठून मिळाला? दमानिया यांनी पत्रकार परिषदेत सगळंच सांगितलं

ताज्या बातम्या