नाशिक | प्रतिनिधी | Nashik
अध्यात्म आणि दैवी शक्तीचा बुरखा पांघरून कोट्यवधींचे मायाजाल विणणाऱ्या अशोक खरात प्रकरणाचा (Ashok Kharat Case) एसआयटीकडून (SIT) होणारा तपास आता एका गंभीर वळणावर येऊन पोहोचला आहे. आमच्या घरात पोत्यांनी पैसा यायचा आणि तो मोजण्यासाठी मशीन लागायचे, अशी धक्कादायक कबुली खुद्द खरातच्या मुलाने दिल्याने तपास यंत्रणांचा डोळे विस्फारले आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे आता सिन्नरच्या जगदंबा आणि कोपरगावच्या समता पतसंस्थेपर्यंत पोहोचले असून, राजकीय नेत्यांशी असलेल्या साट्यालोट्याचा पर्दाफाश होण्याची दाट शक्यता आहे.
हे देखील वाचा : Breaking News : दिंडोरीत विहिरीत कार कोसळून नऊ जणांचा मृत्यू; दरगोडे कुटुंबीयांवर काळाचा घाला
शुक्रवारी खरातचा अत्यंत जवळचा हस्तक आणि सिन्नरमधील जगदंबा पतसंस्थेचा संचालक नामकर्ण आवारे हा एसआयटीच्या जाळ्यात पुरता अडकला असून, शुक्रवारी (दि.३) त्याची तब्बल सात तास कसून चौकशी करण्यात आली. आवारे याच्या माध्यमातून खरातने आपला काळा पैसा (Money) पतसंस्थांच्या जाळ्यात जिरवल्याचा संशय आहे. याचसोबत खरातचे फॅमिली डॉक्टर आणि शिवनिका संस्थानचे विद्यमान विश्वस्त डॉ. नंदकिशोर कातोरे यांचीही कसून चौकशी करण्यात आली. डॉ. कातोरे यांनी आपली बाजू मांडताना सांगितले की, खरातशी माझे नाते केवळ डॉक्टर आणि रुग्ण म्हणूनच होते. शस्त्रक्रियेनंतर वाढलेल्या ओळखीचा फायदा घेत त्याने मला विश्वस्त होण्यासाठी गळ घातली. मात्र, या तथाकथित आध्यात्मिक संस्थांच्या आडोशाने नेमके कोणते आर्थिक व्यवहार सुरू होते, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
हे देखील वाचा : Nashik Dindori Accident News : कार विहिरीत कोसळून नऊ जणांचा करुण अंत; दुर्घटनेनंतर मंत्री झिरवाळांना स्थानिक घेराव घालत म्हणाले “या निष्पाप…”
खरातचा आर्थिक सल्लागार आणि पुण्यातील सीए ललित पोफळे हा या संपूर्ण रॅकेटचा खरा मास्टरमाइंड असल्याचे समोर येत आहे. तो खरातच्या ट्रस्टवर विश्वस्त म्हणूनही कार्यरत होता. धक्कादायक म्हणजे, मुंबईतील एका अति भव्य पंचतारांकित हॉटेलमध्ये (Hotel) पोफळेचा एक लक्झरी सूट कायमस्वरूपी राखीव असायचा. दिवसाला २५ हजार रुपये भाडे असणाऱ्या या सूटवर वर्षाला सुमारे एक कोटी रुपये खर्च केले जात होते. हा सूट केवळ वास्तव्यासाठी नसून, तिथून कोट्यवधींच्या आर्थिक गैरव्यवहारांची सूत्रे हलवली जात होती. या ठिकाणी अशोक खरातच्या उपस्थितीत बड्या राजकीय नेत्यांच्या आणि उद्योजकांच्या गुप्त बैठका पार पडत असत. हवालामार्फत पैसे परदेशात वळवणे आणि प्रभावशाली व्यक्तींना ब्लॅकमेल करण्यासाठी हनी ट्रॅप सारखे सापळे रचले जात असल्याचा दाट संशय तपास यंत्रणांना आहे. अध्यात्म, राजकारण आणि काळा पैसा यांचा हा खतरनाक कॉकटेल आता खरातला आणि त्याच्या हस्तकांना तुरुंगाची हवा खाण्यास भाग पाडणार, हे निश्चित मानले जात आहे. या चौकशीमुळे नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील (Nashik and Ahilyanagar District) अनेक बड्यांचे धाबे दणाणले आहेत.
हे देखील वाचा : Devendra Fadnavis : दिंडोरीतील कार अपघाताच्या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त; मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांच्या मदतीची घोषणा
राजकीय लागेबांधे आणि पतसंस्था रडारवर
तपासातून समोर आलेली नावे आणि कनेक्शन अधिक गंभीर आहेत. तटकरे-चाकणकर-कोयटे हे खरातचे भक्त असल्याचे बोलले जात असून, खरातचा पैसा कोयटेंच्या पतसंस्थेतील चाकणकरांच्या खात्यात गेल्याची चर्चा आहे. हाच पैसा पुढे तटकरेंचा पार्टनर असलेल्या चौधरीच्या प्रोजेक्टमध्ये वळवण्यात आल्याचा संशय आहे. खरातची जमीन आणि चाकणकरांचा प्रोजेक्ट रायगड जिल्ह्यात असून, खरातची मुलगी तृप्तबाला व सीए पोफळे यांची पुण्यात मोठी प्रॉपर्टी असल्याचे निष्पन्न होत आहे. खरातच्या काळ्या पैशाची विल्हेवाट लावण्यासाठी जगदंबा आणि समता या दोन मोठ्या पतसंस्थांचा वापर झाल्याचा पोलिसांना संशय आहे. या पतसंस्थांमध्ये खरात आणि त्याच्याशी संबंधित किती बेनामी खाती आहेत, याचा सविस्तर अहवाल एसआयटीने मागवला आहे.
हे देखील वाचा : Nashik Dindori Accident News : मंत्री महाजन, भुसे, झिरवाळ यांच्यासह खासदार भगरेंकडून घटनास्थळाची पाहणी
तपासातील खुलासे
- घरात नोटा मोजण्याचे यंत्रः अनेकांकडून आलेला पैसा पोत्यांमध्ये भरून घरात आणला जात होता, अशी कबुली खरातच्या मुलाने दिली आहे.
- अब्जावधींचे व्यवहारः सीए ललित पोफळेच्या माध्यमातून मुंबईतील हॉटेलमधून हवालाचे मोठे रॅकेट चालवले जायचे.
- बेनामी मालमत्ताः खरातची मुलगी आणि सहकाऱ्यांच्या नावावर पुणे व रायगडमध्ये मालमत्ता असल्याची माहिती.





