Wednesday, June 10, 2026
HomeनाशिकNashik Ravindra Erande Crime : 'सन्मानयुग' च्या नावे 'कलंकयुग'; एरंडेच्या 'त्या' क्लिप्समध्ये...

Nashik Ravindra Erande Crime : ‘सन्मानयुग’ च्या नावे ‘कलंकयुग’; एरंडेच्या ‘त्या’ क्लिप्समध्ये अनेक संसार पणाला

पोलिसांच्या हाती इगतपुरीचे धागेदोरे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

खरात फाईल्सनंतर नाशिक हादरवून सोडणाऱ्या ‘एरंडे फाईल्स’ मधील काळी कृत्ये आता एकामागून एक समोर येत आहेत. पत्रकारितेच्या बुरख्याआड वासनेचा बाजार मांडणाऱ्या रवींद्र गणपत एरंडे (Ravindra Erande) याला शनिवारी सातपूरच्या (Satpur) अशोकनगर भागात झालेल्या ‘स्पॉट पंचनाम्यात’ पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा पुन्हा एक हार्डडिस्क हाती लागली आहे. १०० पेक्षा जास्त अश्लिल व्हिडिओ असलेल्या या फाईल्समुळे सातपूरमधील (Satpur) अनेक घरांचे संसार पणाला लागले आहेत. त्यातील आठ पीडितांचे समुपदेशन पोलिसांनी सुरु केले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : खरातच्या घरात पोतेभर पैसा; मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमधून हवाला रॅकेट!

शनिवारी (दि. ४) सायंकाळी जेव्हा पोलीस (Police) पथक एरंडेला घेऊन त्याच्या ‘सन्मानयुग-१४’ या कार्यालयात पोहोचले, तेव्हा तिथले दृश्य संतापजनक होते. इतके गंभीर गुन्हे दाखल असूनही आणि अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप असतानाही, एरंडेच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाची एकही जाण नव्हती. उलट, फॉरेन्सिक पथक आणि पोलिसांशी बोलताना तो ज्या पद्धतीने वागत होता, जणू काही तिथे एखादी ‘हास्यजत्रा’ सुरू आहे, असा भास उपस्थितांना झाला. आरोपीचा हा निर्लज्जपणा पोलिसांनाही चक्रावून टाकणारा ठरला. पंचनाम्यादरम्यान पोलिसांनी केवळ कार्यालय तपासले नाही, तर गुन्ह्याचे मूळ असलेले तांत्रिक पुरावे जप्त केले आहेत.

हे देखील वाचा : Anjali Damania : DCM शिंदेंच्या पीएचे खरातसोबत कॉल, समता पतसंस्थेतही अनेक व्यवहार; सीडीआर कुठून मिळाला? दमानिया यांनी पत्रकार परिषदेत सगळंच सांगितलं

दरम्यान टॅबमध्ये काही महिलांचे व्हिडिओ (Women Videos) वारंवार रेकॉर्ड करण्यात आले आहेत. त्यांना ब्लॅकमेल करून वारंवार शोषण केले जात होते का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. पीडित महिलांची ओळख उघड होऊ नये, यासाठी पोलीस ‘अदृश्य’ पद्धतीने काम करत आहेत. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे यांच्या निर्देशाने त्यांच्या विशेष पथकाने अत्यंत गोपनीयरीत्या ८ महिलांची ओळख पटवण्यात यश मिळवले आहे. सध्या या महिलांचे समुपदेशन सुरू असून, त्यांना विश्वासात घेतले जात आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : सातपूरला ‘खरात फाईल्स’ची पुनरावृत्ती! लैंगिक शोषण प्रकरणी रवींद्र एरंडेला बेड्या

लॉजमध्ये मजा

एरंडेच्या गैरकृत्यांची यादी थेट इगतपुरीतल्या लॉजपर्यंत पोहोचल्याचे समजते. त्याने स्तःच्या कार्यालयासह इगतपुरीतल्या लॉजमध्ये महिलांसोबत शरीर संबंध ठेवत गोपनीयरित्या त्याचे व्हिडिओ तयार केले. यासह हस्तरेषा तज्ञ असल्याचा दावा करुन एरंडे यानेही कथित ‘भविष्यवाणी’ केल्याचा संशय आहे. एरंडेकडील टॅब व हार्डडिस्कमध्ये अश्लिल व्हिडिओ आहेत. त्याची फॉरेन्सिक तपासणी सुरू असून, त्याने हे व्हिडिओ प्रसारित केले असण्याची किंवा त्याद्वारे पीडित महिलांना ‘ब्लॅकमेल’ केल्याचा संशय आहे. त्यानुसार सायबर पोलीसदेखील स्वतंत्र तपास करीत आहेत.

हे देखील वाचा : Devendra Fadnavis : खरातच्या मालमत्तेची ईडी चौकशी होणार – मुख्यमंत्री फडणवीस

ताज्या बातम्या

विधानपरिषद निवडणूक : अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांचा महायुतीचे उमेदवार नरेंद्र...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashikनाशिकमध्ये होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (िद.१०) मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी अखेर महायुतीचे...