नाशिक | Nashik
दुकानात (Shop) विक्रीसाठी दिलेले संगणक (Computers) व साहित्याची परस्पर विक्री करून दोघांनी व्यावसायिकास १८ लाख ६० हजार रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) मयूर पारख व पूजा पारख (दोघे रा. सुवर्ण बंगला, स्वामी विवेकानंद मार्ग, गंगापूररोड) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगापूर रोडवरील रहिवासी नितीन चंद्र गिते (४९) यांच्या रामचंद्र फिर्यादीनुसार, दोघा संशयितांनी २९ सप्टेबर ते २४ डिसेंबर २०२४ या कालावधीत त्र्यंबकरोड वरील विकास कॉलनी येथील नाईस कॉम्प्युटर कार्यालयात गंडा घातला. गिते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा संगणक दुरुस्ती व वितरणाचा व्यवसाय आहे. संशयित पारख दाम्पत्य २०१९ मध्ये गिते यांच्या कार्यालयात आले व त्यांनी महात्मा गांधी रोडवरील एम. आर. पारख इलेक्ट्रॉनिक्स दुकानात संगणक, प्रिंटर, लॅपटॉप व इतर साहित्य विक्रीसाठी लागत असल्याचे सांगितले. त्यासाठी गिते यांनी संगणक व इतर साहित्य पुरवावे, त्यांची विक्री करून पैसे वेळेत दिले जातील, असे पारख दाम्पत्याने गिते यांना सांगितले.
त्यानुसार गिते व पारख यांच्यात व्यवहार झाले. सुरुवातीस पारख दाम्पत्यांनी पैसे (Money) नियमित वेळेत दिल्याने गिते यांचा विश्वास बसला. २०२४ मध्ये गिते यांच्याकडून पारख दाम्पत्याने लाखो रुपयांचा संगणक व इतर साहित्य व वापरासाठी प्रिंटर घेतले. त्यापैकी काही साहित्याचे पैसे व माल पारख दाम्पत्याने गिते यांना परत केला. मात्र उर्वरीत १८ लाख ६० हजार रुपये देण्यास टाळाटाळ केली. पारख दाम्पत्याने दुकानातील सर्व साहित्य परस्पर विक्री करून निघून गेल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.