Saturday, February 21, 2026
Homeक्राईमNashik Crime : मजुरीच्या आड रेकी, दरोड्याची तयारी; दिल्लीतील सोळा जणांच्या टोळीचा...

Nashik Crime : मजुरीच्या आड रेकी, दरोड्याची तयारी; दिल्लीतील सोळा जणांच्या टोळीचा ‘नाशिक प्लॅन’ फसला

बीएसएनएल केबलवर डल्ला

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दिल्लीहून रेल्वेमार्गे नाशिकमध्ये (Nashik) दाखल झालेल्या सोळा जणांच्या सशस्त्र टोळीचा (Gang) बीएसएनएलच्या भूमिगत कॉपर केबलवर डल्ला मारण्याचा कट सरकारवाडा पोलिसांनी (Sarkarwada Police) उधळून लावला. कॉलेजरोडवरील बिग बाजारसमोर गुरुवारी (दि.१९) रात्री गस्तीदरम्यान संशयास्पद हालचाली दिसताच गुन्हे शोध पथकाने सापळा रचत चौघांना अटक केली. पोलीस दिसताच उर्वरित बारा संशयित पसार झाले असून त्यातील काहींनी आयशर व जेसीबीची चोरी केल्याचे समोर येत आहे.

- Advertisement -

यानंतर रेकी करून कॉलेजरोड भागात दरोडा टाकण्यासाठी प्लॅनिंग करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पहाटे साडेचार वाजता कॉलेजरोड येथील पाटील लेनमध्ये आठ ते पंधरा संशयित एकत्र आढळले. त्याचवेळी सरकारवाडा पोलिसांचे गुन्हे शोध पथक गस्तीदरम्यान तेथे पोहोचले. पोलिसांनी (Police) विचारणा करताच काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले तर चौघांना पकडण्यात यश आले. पथकाने तत्काळ परिसराला वेढा घातला. संशयितांनी एक मोपेड चोरी केल्याचे आढळले असून त्यात दहा किलोचा कोयता (सत्तूर) आढळला आहे.

YouTube video player

चौकशीत संशयितांकडून रेल्वे तिकिटे हस्तगत करण्यात आली असून ते सर्वजण दिल्लीहून रेल्वेने नाशिकमध्ये आल्याचे स्पष्ट झाले आहे. प्राथमिक तपासात या टोळीने बीएसएनएलची सुमारे सहा लाख रुपयांची भूमिगत कॉपर केबल आधीच लांबवल्याचे उघड झाले असून त्यासंदभनि बीएसएनएलचे किरणकुमार देवरे यांनी फिर्याद नोंदविली आहे. चोरी केलेली के बल अवजड वाहनातून हलविण्याची तयारी सुरू असतानाच पोलिसांनी कारवाई केल्याने हा गुन्हा उघड झाला आहे. सोळापैकी चौघांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

चोरटे बनले मजूर, कामगार

शहरात सिंहस्थासह स्मार्ट सिटीअंतर्गत विविध विकासकामे सुरू असून त्याचाच गैरफायदा घेत या सर्वच सोळा संशयितांनी स्वतःला बांधकाम कामगार, मजूर भासवले. पहाटे युद्धपातळीवर ही विकासकामे सुरू असल्याचे दर्शवून चोरी व दरोडा टाकण्याचे नियोजन केल्याचे तपासात समोर आले आहे. सर्वच संशयितांनी ‘रिफ्लेक्टर जॅकेट घातल्याचे समोर आले असून सध्या पाच रिफ्लेक्टर जॅकेट हस्तगत करण्यात आले आहेत. तर चोरलेली केबल, आयशर व जेसीबी जप्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

संशयितांची नावे अशी

सोनू मोहम्मद मसिआलम खान (३२), कैसर मोहम्मद कलीमउद्दीन (३१), राजेशकुमार पांडे (४१), कपिल सपन खडिया (४१), संदीप, इलियास मोसिम मुकादम, मोहम्मद राजा, सलमान, वीरू, सूरज व अन्य सहा हा संशयित अशी संशयितांची नावे आहेत. सर्व संशयित दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. तपास सहायक निरीक्षक प्रकाश पाटील करत आहेत.

मुद्दे

  • एमएच १५ इएल ७२८४ या क्रमाकांची अॅक्टिव्हा जप्त
  • टिकाव, एक्सा ब्लेड, कन्स्ट्रक्शन हेल्मेट
  • २० फुटांचे वायर लूप, रेल्वे प्रवासाची तिकिटे
  • चार मोबाईल, सर्वच संशयितांकडे रिफ्लेक्टर जॅकेट
  • मोपेडवरून रेकी करत रचला दरोड्याचा कट
  • मुद्देमाल जप्ती व काहीं संशयितांची अटक लवकरच

ताज्या बातम्या

CRPF जवानांचा ट्रक कालव्यात कोसळला; ९ जवान जखमी

0
श्रीनगर। Srinagar जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये आज एक मोठी दुर्घटना घडली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) एक बुलेटप्रूफ वाहन अनियंत्रित होऊन थेट कालव्यात कोसळल्याने खळबळ...