Monday, July 13, 2026
HomeनाशिकNashik News : तब्बल सोळा हजार चालकांनी मोडला सिग्नल; 'एवढ्या' जणांनी ओलांडली...

Nashik News : तब्बल सोळा हजार चालकांनी मोडला सिग्नल; ‘एवढ्या’ जणांनी ओलांडली ‘झेब्रा क्रॉसिंग’

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील वाहतूक शिस्तीचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित राहिला; मात्र शुक्रवारी (दि. २०) त्याला ‘ई चलन द्वारे ‘डिजिटल उत्तर मिळाले. विविध चाळीस प्रमुख सिग्नलवर (Signal) सीसीटीव्ही-आधारित ई-चलन प्रणाली प्रत्यक्षात सुरू झाली आणि अवघ्या साडेआठ तासांत १६ हजार वाहनचालकांनी (Drivers) सिग्नल तोडल्याची नोंद प्रणालीने केली. झेब्रा क्रॉसिंगवर ७०० हून अधिक वाहनचालक उभे असल्याचेही कॅमेऱ्यांनी टिपले.

- Advertisement -

नियंत्रण कक्षात प्रत्येक नियमभंगाची नोंद होत असून बेशिस्त चालकांची संपूर्ण ‘ई-कुंडली’ तयार झाली आहे. त्यानुसार, आता या बेशिस्त चालकांना ‘दंड भरण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.चलन यंत्रणा सुरू करण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने २०१८ पासून स्मार्ट सिटी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. २०२४ आणि २०२५ मध्ये पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ठेकेदाराची कानउघाडणी केल्यानंतर कॅमेऱ्यांचा (Camera) ‘लाईव्ह फीड’ नियंत्रण कक्षात उपलब्ध झाला. शहर आयुक्तालयाच्या थेट नजरेत आले; मात्र दंडात्मक प्रक्रिया प्रलंबित होती. अखेर २० फेब्रुवारीपासून ई-चलनची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली.

वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त किरिथिका सी. एम., सहाय्यक आयुक्त अद्विता शिंदे आणि गुन्हेशाखेचे संदीप मिटके यांनी नियंत्रण कक्षातून प्रत्यक्ष आढावा घेत कारवाईला गती दिली. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कॅमेरे कार्यान्वित असतानाच ई-चलन प्रणाली जोडल्याने वाहतूक व्यवस्थापनाला बळ मिळाले आहे. त्यामुळे, कॅमेऱ्यांनी आता ‘पोलीस नाहीत’ ही सबब संपवली आहे. प्रत्येक चौक डिजिटल नजरकैदेत आला असून, नियमभंग करणाऱ्यांसाठी दंड अटळ झाला आहे.

पंधरा लाख चालकांनी केले नियमांचे पालन

या कारवाईत झेब्रा क्रॉसिंगच्या नियमभंगावर विशेष लक्ष देण्यात आले. मागील आठवड्यात १३ हजार ६६० वाहनचालकांनी झेब्रा नियम मोडल्याची नोंद असून शुक्रवारी दुपारी साडेचारपर्यंत ७४६ जणांचे उल्लंघन केले. दरम्यान, नियम पाळणाऱ्यांची संख्याही मोठी असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. आठवडाभरात १४ लाख ६५ हजार १०५ वाहनचालकांनी सिग्नल आणि झेब्रा क्रॉसिंगचे नियम काटेकोर पाळले.

मुद्दे

  • दिवसभरात प्रायोगिक तत्वावर २० चलन ठोठावले
  • सिस्टिममधून चलन सेंट झाल्यावर बेशिस्तांची धावपळ
  • मोबाईलवर मेसेज मिळताच अनेक वाहनधारक आयुक्तालयात
  • प्रत्यक्ष कारवाई झाल्याने अनेकांनी घेतला धसका
  • नियम पाळणाऱ्याची संख्या वाढणार

ताज्या बातम्या

default-featured-image

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या राजकारणात विक्रम; देवाभाऊ ठरले सर्वाधिक काळ मुख्यमंत्री...

0
मुंबई | Mumbai महाराष्ट्राच्या राजकीय (Maharashtra Politics) इतिहासात एक नवा ऐतिहासिक विक्रम नोंदवला गेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक काळ पद...