Thursday, September 19, 2024
HomeनाशिकNashik Crime News : जाच असह्य झाल्याने गोळीबार; पोलीस तपासात संशयितांची माहिती

Nashik Crime News : जाच असह्य झाल्याने गोळीबार; पोलीस तपासात संशयितांची माहिती

आरटीआय कार्यकर्त्यावरील फायरिंग प्रकरण

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

दोन ते अडीच वर्षांपासून थंड बासनात पडलेल्या सिडकोतील आरटीआय कार्यकर्त्यावरील गोळीबाराच्या (Firing) गुन्ह्याचा तपास अंतिम टप्प्यात आला आहे. आरटीआय कार्यकर्ता प्रशांत जाधव (Prashant Jadhav) अनेक प्रकरणांत मानसिक त्रास देत असल्याने अटकेतील संशयित अंकुश शेवाळे याने सराईत मित्र मयूर बेद याला जाधव यांचा काटा काढण्यास सांगितले होते, त्यातूनच हा गोळीबार झाला. न्यायालयाने शनिवारी (दि. १४) कटाचा सूत्रधार मयूर बंद याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : गोळीबार प्रकरण चिघळले; संशयितांच्या दाव्यानंतर बडगुजरपुत्रास पोलिसांची नोटीस

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांच्या निर्देशाने गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचनेनुसार गुंडाविरोधी पथकाने दोन ते अडीच वर्षांपूर्वी घडलेल्या गोळीचाराच्या दाखल गुन्ह्याची कागदपत्रे अंबड पोलिसांकडून (Ambad Police) मिळवत गत दोन महिन्यांपासून सखोल तपास सुरु केला. त्यात सर्वच बाजू पडताळून तब्बल ६०० हून अधिक संशयितांची चौकशी केली. त्यात एक मुख्य ‘लिड’ गुंडा विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना मिळाला.

हे देखील वाचा : Nashik Crime News : साठ लाखांच्या खंडणीची मागणी; कंपनी चालकाची न्यायालयात तक्रार

त्यावरुन पथकाने तपास करून संशयित आकाश सूर्यतळ याला ताब्यात घेतले, तेव्हा त्याने कारागृहात (Jail) असलेल्या श्रीकांत वाकोडे उर्फ बारक्या, सनी पगारे उर्फ टाक्या (दोघे रा. जेतवननगर, उपनगर) यांची नावे सांगितली. पथकाने यानंतर दोघांनाही पकडले. तेव्हा या तिघांनी संशयित मयूर बेदचे नाव उघड केले. त्याच्या उपस्थितीत व सांगण्यानुसारच पूर्वनियोजित कट रचल्यानुसार, फेब्रुवारी २०२२ मध्ये आरटीआय कार्यकर्ता प्रशांत जाधव यांच्यावर रात्री अकरा वाजेच्या सुमारास उपेंद्रनगर परिसरात गोळीबार केला.

हे देखील वाचा :  Nitin Gadkari : “मला विरोधकांनी पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती”; नितीन गडकरींचा मोठा गौप्यस्फोट

दरम्यान, हा गोळीबार करताना मयूर बंद, वाकोडे व सनी उर्फ टाक्यासोबतच होता. मात्र, दोघांनी दुचाकीवरुनच दोन राऊंड फायर केले असता, परफेक्ट शॉटशूटींग न झाल्याने एक राऊंड हवेत तर दुसरा जाधव यांच्या पायाला लागला. त्यामुळे जाधव बालंबाल बचावले होते. त्यानंतर, आता तपासात अनेक गंभीर बाबी उघड होत असून त्यात मयूर बंद आणि अंकुश शेवाळे यांच्याभोवतीच तपासाची सुई फिरते आहे.

रेल्वेमध्येच लपला

संशयित अंकुश आणि प्रसाद शिंदे, मयूर हे जवळचे मित्र आहेत. दरम्यान, मयूरला अठक होण्याची कुणकूण लागली असता, त्याने वाशी सोडून मुंबईतून हैद्राबाद, अजमेर असा प्रवास केला. तो बहुतांश वेळ रेल्वे प्रवासात व्यतित करून लपत होता. यानंतर तो अचानक पुण्यात आला. त्याची माहिती, तांत्रिक विश्लेषण केल्यावर तो चाकण भागात असताना त्याला पकडण्यात आले.

वाशीत टाकले हुक्का पार्लर

मयूर बेद हा पूर्वीपासूनच सराईत असून त्याच्यावर प्राणघातक हल्ला व खुनाचे गुन्हे नोंद आहेत. तो गेल्या पाच वर्षांपासून ओळख लपवून राहत होता. दरम्यान, काही वर्षांपासून तो मुंबईतील वाशी येथे स्थायिक झाला. पण, त्याने वास्तव्याचा पत्ता तेथील मित्र व डान्सबारमधीस प्रेयसींना देखील दिला नाही. त्याने वाशीत गेल्यावर स्थानिक सराईतांची हातमिळवणी करुन पार्टनरशिपमध्ये हुक्का पार्लरचा व्यवसाय सुरु केला होता. तसेच आर्थिक व्यवहार आणि खर्च डान्सबारमधील प्रेयसी आणि सराईतमित्रांकरवी सुरु केला. त्यातच एका प्रेयसीचे एटीएम डेबीट कार्ड व तिच्या नावाच्या सीमकार्डचा मोबाईल तो वापरत होता. तर, नाशिकमध्ये बेदच्या कुटुंबाचे चिकन शॉप असून त्याचे वडील महापालिकेच्या स्वच्छता विभागात कार्यरत होते.

हे मुद्दे अद्याप उघड नाहीत

  • आरटीआय कार्यकर्त्यांची चौकशी होणार!
  • मयूरला गोळीबारासाठी किती रुपयांची सुपारी देण्यात आली
  • जाधव यांची ह्त्या करण्याचा कट का रचण्यात आला
  • नेमका असा कोणता त्रास आरटीआय कार्यकर्ता देत होता?
  • शेवाळेकडे आरटीआय कार्यकर्ता तगादा का लावत होता?
  • २० हजार रुपयांपर्यंतची आर्थिक देवाणघेवाण?
  • प्रसादसह शेवाळेचा रोल काय?
  • कहा कोणी व कुठून आणला?

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या