Monday, April 6, 2026
Homeक्राईमNashik Crime : खंडणी उद्योगाचा विस्तार; अडीच महिन्यांत शर्मावर दहावा गुन्हा

Nashik Crime : खंडणी उद्योगाचा विस्तार; अडीच महिन्यांत शर्मावर दहावा गुन्हा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

उद्योजकांविरोधात एमआयडीसी कार्यालयात बोगस तक्रारी दाखल करून दबाव टाकत लाखोंची खंडणी उकळणा-या कथित समाजसेवक संतोष शर्मा याच्याविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात (Satpur Police Station) पुन्हा खंडणीचा गुन्हा (Extortion Case) दाखल करण्यात आला आहे. शर्माने कंपनीच्या गेटवर जाऊन उद्योजकाला धमकावत ६० हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप तक्रारीत आहे.

- Advertisement -

या प्रकरणात संतोष शर्मा (Santosh Sharma) याच्यासह संशयित शशी राजपूत, रोहित म्हस्के आणि कैलास खंडेया संशयितांवर गुन्हा नोंद आहे. आशिष सोमनाथ शिनकर (४७, रा. नयनसागर सोसायटी, कामटवाडे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सातपूर औद्योगिक वसाहतीत त्यांची ‘इन्फिनिटी एंटरप्राईजेस प्रा. लि. ही कंपनी आहे. या कंपनीविरोधात संशयित संतोष शर्माने एमआयडीसी कार्यालयात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर संशयितांनी कंपनीच्या गेटवर जाऊन ‘अतिक्रमण हटाव’ असे पोस्टर लावले.

तसेच कंपनीतील (Company) कामगारांमध्ये असंतोष निर्माण करत त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोपही तक्रारीत नमूद आहे. यानंतर संशयितांनी शिनकर यांच्याकडे तीन लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. जानेवारी महिन्यापासून संशयित त्यांना सातत्याने त्रास देत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. नोव्हेंबर महिन्यात संशयित कंपनीच्या गेटवर आले असता त्यांनी दमदाटी करत ‘गेम करून टाकण्याची’ धमकी दिली. याचवेळी शिन कर यांच्याकडून बळजबरीने ६० हजार रुपये खंडणी उकळण्यात आल्याचे फिर्यादीत स्पष्ट करण्यात आले आहे. अखेर या त्रासाला कंटाळून शिनकर यप्ती सातपूर पोलीस ठाण्यात धाव घेत खंडणीची तक्रार दाखल केली.

दरम्यान, संतोष शर्मा याच्याविरोधात अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) खंडणीचे नऊ-दहा गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे.अंबड पोलिसांनी शर्माला अटक केली असून, त्याने खंडणी उद्योगाचा विस्तार करत अनेकांना धमकावत गुन्हेगारी व दहशत माजवल्याचे समोर आले आहे. सातपूर पोलीस ठाण्यातील महिला उपनिरीक्षक सुहासिनी बारेला पुढील तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : अजय बागूलसह तिघांना हायकोर्टाकडून जामीन

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शहरात खळबळ उडवून देणाऱ्या विसे मळा गोळीबार आणि अपहरण प्रकरणातील (Firing Case) संशयितांना अखेर दिलासा मिळाला आहे. भाजप नेते सुनील...